देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Illegal sand transport) : राज्य निवडणूक आयोगाने विधासभेच्या निवडणुका घोषित केल्या असल्याने रेती चोरीवर करडी नजर ठेवणारे महसूल व पोलिस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात दिवसभर व्यस्त असतात. याच्याच वाळू माफी्यांनी गैरफायदा घेत एकमेकात चढाओढ करीत अवैध रेतीची चोरटी वाहतूक जोरात सुरू झाली आहे.
चिखली आणि दे राजा तालुक्यात वाळू तस्करीचा मोठा खडकपूर्णा प्रकल्प आहे. या (Illegal sand transport) प्रकल्पाचे नंदी पात्र हे इतर नंदी काढच्या गावा बरोबर इसरूळ गावातून गेलेले आहे . या नदी पात्रातून अवैध रेतीची वाहतूक होवू नये म्हणून प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हे नदी पात्रावर तळ ठोकून होते तरी सुद्धा रेती माफीया हे कुणालाही जुमानता अवैध रेतीची वाहतूक करत त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी जे अवैध रेतीचे वाहन मिळेल त्याला ताब्यात घेत कडक कार्यवाह्या करत होते एवढ्यावरच न थाबता गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखक करून काहीनना बाहेर जिल्ह्यातील जेल मध्ये टाकले.
त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका लावल्या त्यामुळे अधिकारी कर्मचारी दिवसभर कार्यालयात थाबतात आणि (Illegal sand transport) रात्रीला वाळू माफीयावर गस्त ठेवतात याचाच गैरफायदा घेऊन वाळू माफी्या हे रात्री ऐवजी भरदिवसा राजरोसपणे एकमेकात चढाओढ करून अवैध रेतीची वाहतूक करतात यामुळे यात काहीतरी मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. रेतीची ही अवैध वाहतूक इसरूळ या गावामधून होत असून, रेती वाहतूक करणारे टिप्पर चालक हे कुणाची पर्वा न करता भरधाव वेगात गावातून टिप्पर नेतात.या गावाच्या रस्त्यावर अनेकांनी आंदोलन निवेदन आणि उपोषण केले होते तरी सुध्दा नदी पात्रातून रेतीची वाहतूक मोठ्या प्रमानावर सुरु आहे त्यामुळे जनतेचा उपोषण कर्त्यावर रोष निर्माण झाला आहे.
या अवैध वाळूच्या ओव्हरलोड टिप्परमुळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. (Illegal sand transport) वाळूमाफिया अनेकदा अधिकार्यांवरही हल्ले करतात. त्यामुळे जिल्ह्यात वाळूमाफियांची दहशत आहे.एकीकडे वाळू माफीया हे शासनाचा महसुल बुडत असून वाळु विक्रेत्यांनी रेतीचे दर गगनाला भिडवल्याने घरांचे बांधकाम करणे जिकरीचे झाले आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून भरदिवसा भर धाव वेगाने सुरु असलेली अवैध रेतीची वाहतूक बंद करावी अशी मागन्ज जनतेकडून होत आहे.