शेतकऱ्यांची मात्र कुंचबना
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Talathi Andolan) : विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी नागपूर संघाचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष विजेंद्रकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली दि.१८ जुलै पासून अन्यायकारक बदल्या रद करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात जिल्हाभर तलाठी (Talathi Andolan) व मंडळ अधिकारी यांनी आंदोलन सुरु केलेले आहे .परंतु जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होवू लागली आहे.
जिल्हा प्रशासनाने विदर्भ पटवारी मंडळ अधिकारी संघ नागपूर यांचे सदर आंदोलन हे प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, विनंती व आपसी बदल्या करणे, जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देणे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी/मं.अ.यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी अशा इतर प्रलंबित मागण्या संदर्भात दि. १८ जुलै पासून बेमुदत रजा आंदोलन सुरू करण्यात आले.
परंतु अद्यापही जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र या रजा आंदोलनामुळे गावा गावातील महसुली कामकाज ठप्प झाले असल्याने शेतकऱ्यासह सामान्य जनतेची फार मोठी कुचंबना होवू लागली आहे. जर प्रशासनाने दोन दिवसात तोडगा न काढल्यास सदर आंदोलनाची व्याप्ती विदर्भ पटवारी संघ नागपूर यांचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्णजी गाढवे यांचे नेतृत्वात संपूर्ण विदर्भात वाढविणार असल्याची माहिती विजेंदरकुमार धोंडगे जिल्हाध्यक्ष विदर्भ पटवारी संघ जिल्हाशाखा बुलढाणा यांनी दै. देशोन्नती शी सांगण्यात आले आहे.