कोरपना (Chandrapur) :- चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रगण्य नावाजलेली आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) उद्योगातील कामगारांच्या विविध मागण्याकरिता माजी खासदार तथा कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.
लोडिंग कामगारांना जाहीर पाठिंबा, जनआंदोलन उभारण्याचा इशारा
आंदोलनाच्या एक दिवसापूर्वी दिनांक ९ आगस्ट ला अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाकडून दुपार पासून अचानक लोडींग (loading) परिसरातील गेटवर टाळे लावून दुपार पाळीचे सिमेंट उत्पादन बंद करून नियमित स्थानिक लोडरला कामावर घेण्यास नकार दिल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला रात्रीतून परप्रांतीय कामगारांना आणून कंपनीने सिमेंट प्रोडक्शन (Production) सुरू केल्याने आणखी मोठा वाद निर्माण झाला आहे. आता अल्ट्राटेक आवारपूर परिसरातील दत्तक गावातील सरपंचानी सुद्धा कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्याकरिता कंपनी व्यस्थापनाला निवेदन देऊन लोडर कामगारांना पाठिंबा दर्शवीला आहेत. यावेळी देताना प्रियांका दिवे सरपंच आवारपूर,अरुण रागीट सरपंच (पाल) बाखर्डी, मेघा पेंदोर सरपंच नांदा,बाळकृष्ण काकडे उपसरपंच आवारपूर, संगीता मडावी सरपंच नोकारी, अरुण काळे उपसरपंच हिरापूर, आशिष देरकर उपसरपंच बिबी, रत्नाकर चटप सदस्य ग्रा. प. नांदा, कामगार संघटनेचे शिवचंद्र काळे कार्याध्यक्ष व साईनाथ बुच्चे जनरल सेक्रेटरी यांच्यासह लोडर कामगार उपस्थित होते.
कंपनी विरोधात जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला
अल्ट्राटेक व्यवस्थापनाच्या दडपशाही धोरणामुळे कामगार तथा दत्तक गावातील जनतेवरील अन्यायामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे कामगार तथा दत्तक गावातील नागरिकांमध्ये कंपनी व्यवस्थापनाबाबत रोष उफाळून येत आहे. दि.०९ /०८/२०२४ पासून लोडर कामगारांना कामावर येण्यास मज्जाव करणे, कामावर घेणे बंद करून याउलट परप्रांतीय कामगार आणून नियम धाब्यावर बसवून अशांतता पसरविण्यात येत आहेत, यामुळे दत्तक गावातील स्थानिक लोडर कामगार व त्यांचे कुटुंबियांना मानसिक व आर्थिक (Financial) ताण सहन करावा लागत असून सर्व लोडर कामगारांना १ आगस्ट २०२४ पूर्वीची जशी स्थिती होती. त्याप्रमाणे पूर्ववत करावी कामगारांना तात्काळ न्याय न मिळाल्यास किव्हा त्यांना कामावर रुजू न केल्यास सरपंच संघटना कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन कंपनी विरोधात जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला असून व ते आंदोलन चिघळल्यास संपूर्ण जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाची राहील असे दत्तक गाव सरपंच संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद आहेत.