झरी (Adv. Govind Tamboli) : येथील अॅड. गोविंद तांबोळी (Adv. Govind Tamboli) वय ३३ वर्ष यांचे रविवार ९ जून रोजी सकाळच्या सुमारास अपघाती निधन झाले. झरी येथील अॅड.गोविंद तांबोळी यांचे जिल्हाभरात नामांकीत वकील अशी ओळख होती. ते मुंबई येथे उच्च न्यायालयात वकीली व्यवसाय करत होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार भारती संघटनेत पदाधिकारी देखील होते. या विषयी अधिक माहिती अशी की, अॅड. गोविंद तांबोळी (Adv. Govind Tamboli) शनिवार ८ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.
घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी
नातेवाईकांना भेटून व इतर कामे आटोपुन रविवार ९ जून रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर वरुन (Parbhani Accident) परभणीकडे परतत असतांना ढेंगळी पिंपळगाव ते मानवतरोड दरम्यान रेल्वेतुन पडुन अपघाती मृत्यू झाला. ऐन उमेदीच्या काळात अपघाती निधन झाल्यामुळे या घटनेमाघे घातपात तर नाही असा संशय गावकर्यांनी व्यक्त केला. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी झरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच झरी गावावर शोक कळा पसरली. त्यांच्या (Adv. Govind Tamboli) पार्थीवावर आज सायंकाळी ७ वाजता झरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.