सह पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन, झाडीपट्टी नाटयसंमेलनाचे थाटात उद्धाटन
देसाईगंज (Zadhipatti Nataya sammelan) : पुर्व विदर्भात गर्द वनराईने नटलेल्या चार जिल्ह्यात सुरु असलेल्या स्थानिक लेखक, कलावंतांच्या सादर होत असलेल्या नाटकांमुळे धानाच्या या पट्ट्याला झाडिपट्टी रंगभुमी अशी स्वतंत्र ओळख मिळाली. पुणे , मुंबईकडच्या नाटकांना प्रेक्षक मिळेनासे झाले असतांना झाडिपट्टी रंगभुमीने तब्बल १५० वर्षापासून प्रेक्षकांच्या अविरत सेवेत राहुन आपले अस्तित्व टिकवून ठेवले.मात्र तब्बल १५० वर्षाची परंपरा लाभलेल्या व येथील कलावंत, (Zadhipatti Nataya sammelan) नाट्य निर्मात्यांना शासकीय स्तरावरुन अद्यापही राजाश्रय मिळाला नसल्याने झाडिपट्टी रंगभुमी उपेक्षित आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेता व आपल्या कलेच्या भरोशावर संस्कृती टिकवून ठेवण्यात मौलिक भुमिका बजावलेल्या झाडिपट्टी रंगभूमीला राजाश्रय मिळवून देणे ही आता (Zadhipatti Nataya sammelan) झाडिपट्टी रंगभूमीचा कलावंत या नात्याने माझी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ नियोजन, मदत पुनर्वसन,विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल (Adv. Ashish Jaiswal) यांनी केले.
ते देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्राणंगणात (Zadhipatti Nataya sammelan) झाडिपट्टी नाट्य विकास महामंडळ देसाईगंजच्या वतिने आयोजित ५ व्या झाडिपट्टी नाट्य संमेलनाच्या उद्घाटना प्रसंगी संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाट्य कलावंत प्राचार्य के.आत्माराम होते तर स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. रामदास मसराम होते.प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ नाट्य कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,हास्यसम्राट सिने अभिनेते भारत गणेशपुरे,माजी आ. कृष्णा गजबे,माजी झाडिपट्टी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ.शेखर डोंगरे,डॉ.नरेश गडेकर, अब्दुल गणी शेख,माजी नगर परिषद उपाध्यक्ष मोती कुकरेजा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान आपल्या उद्घाटनपर भाषणात पुढे बोलतांना अॅड. जयस्वाल म्हणाले की झाडिपट्टी रंगभुमीत आजमितीस जवळपास दोन हजार कलावंत आपली उपजिविका भागवीत असुन होत असलेल्या नाटकांच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार उपलब्ध होत आहे.साऊंड सिस्टीम पासुन ते बॅक स्टेजचे कलावंत झाडिपट्टी रंगभुमी पोसते.दिवाळीच्या पर्वावर झाडिपट्टीच्या सिमा पार करून जवळपास आठ जिल्ह्यात झाडिपट्टी रंगभुमीच्या मोठ्या प्रमाणात नाटका सादर होत असुन अलिकडे झाडिपट्टी रंगभुमी ही झाडिवुड म्हणून ओळखल्या जाऊ लागली आहे.
झाडिपट्टी रंगभुमीने (Zadhipatti Nataya sammelan) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलागुणाने सार्या देशाचे लक्ष वेधण्यात यश मिळवले असुन हे झाडिपट्टी रंगभुमीचे मोठे यश आहे.त्यामुळे येथील कलावंत, कला,स्थानिक बोलीभाषा टिकवणे आवश्यक असुन या रंगभुमीला राजाश्रय मिळाल्याशिवाय असे होणे शक्य नसल्याने आणि सत्तेची चावी सद्या हातात असल्याने झाडिपट्टी रंगभुमीला राजाश्रय मिळवून देणारच असल्याचे त्यांनी सांगीतले.
झाडिपट्टी नाट्य विकास महामंडळाच्या वतिने आयोजित ५ व्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून मंडळाच्या वतिने लाखांदूर मार्गावरील चंद्रकमल थिएटर्स पासुन भव्य रॅलीचे आयोजन करून सदर रॅली वाजतगाजत मुख्य मार्गाने संमेलनस्थळी आणण्यात आली. सदर रॅलीत झाडिपट्टचे तमाम पुरष,स्त्री कलावंत यांनी सहभाग घेतला होता.
तसेच आदर्श विद्यालयाचे व महात्मा गांधी विद्यालयाचे लेझीम पथक तसेच कुरुड येथील दिंडी पथकही सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम यांनी, प्रास्ताविक झाडिपट्टी नाट्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी तर आभार लेखक/कलावंत परमानंद गहाणे यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने झाडिपट्टितील समस्त कलावंत तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
देसाईगंज येथे अत्याधुनिक नाटयगृह उभारावे – आ. मसराम
दरम्यान कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आ. रामदास मसराम यांनी देसाईगंज हे झाडिपट्टी रंगभुमीचे माहेरघर असुन या ठिकाणी आजमितीस जवळपास १०० च्या वर रंगभुम्या कार्यरत आहेत.झाडिपट्टी रंगभुमीत सादर होत असलेल्या नाटकांमुळे चार सहा महिण्याच्या सिझनात ७० ते ८० कोटीची उलाढाल करणारी झाडिपट्टी रंगभुमी ही देशातील पहिली रंगभुमी आहे.असे असले तरी येथील कलावंतांना सादर करण्यासाठी,तालीम करण्यासाठी साधे नाट्यगृह नाही.त्यामुळे देसाईगंज शहर हे झाडिपट्टी रंगभुमीचे माहेरघर असल्याचे लक्षात घेता देसाईगंज येथे किमान २० कोटीचे अत्याधुनिक सुविधायुक्त नाट्यगृह बांधण्यास सह पालकमंत्री यांनी जातीने पुढाकार घेऊन येथील कलावंतांची वर्षानुवर्षाची मागणी पुर्ण करावी अशी मागणी आ. मसराम यांनी केली.
