मानोरा (Adv. Gnayak Patni) : मतदार संघातील तळप बु सर्कलमधील वरोली, सेवादासनगर येथे दि १४ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार ज्ञायक पाटणी (Adv. Gnayak Patni) यांचा कार्यकर्त्यांनी मतदारांची डोअर टू डोअर प्रचार केला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकारण तापले आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. ज्ञायक पाटणी (Adv. Gnayak Patni) यांचे कार्यकर्त्यांनी गाव अन् गाव पिंजून काढत प्रचार करीत आहे. वरोली, सेवादासनगर येथे प्रचार दौऱ्यात निळकंठ पाटील, संजय राठोड, लक्षमन राठोड, जनुसिंग जाधव, उदल महाराज, घुंगरू नाईक, प्रेम महाराज, राजु काबरा, सुरेश परांडे, डोमा गवई, प्रदीप ढगे, सुभाष इंगळे, विजय डोईफोडे, देवानंद शिंदे, विष्णू गावंडे आदी सहभागी झाले होते.