२५१५ अंतर्गत विकास कामे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर
रिसोड (Adv. Nakul Deshmukh) : भाजप नेते ॲड नकुल देशमुख (Adv. Nakul Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी २५१५ अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. सदर कामाचं शासन आदेश प्राप्त झाला असून .यामुळे विधानसभेतील अनेक गावातील प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागणार आहेत.
भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख यांनी मागील दीड वर्षात माजी मंत्री माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रिसोड व मालेगावात २५१५ अंतर्गत तसेच ठक्कर बाप्पा, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकासाची कामे मार्गी लावली आहेत. माजी मंत्री अनंतराव जी देशमुख, ॲड. नकुल देशमुख यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकास कामासाठी अनेक गावातील कामे सुचवली त्या अंतर्गत यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते ॲड नकुल देशमुख (Adv. Nakul Deshmukh) यांना रिसोड व मालेगाव तालुक्यातील गावातील अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता.
निधी प्राप्त होताच भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख (Adv. Nakul Deshmukh) यांनी सदर कामे अतिशय गुणवत्ता पूर्ण दर्जाची करत लोकार्पणही केले. त्यामुळे त्यांच्या बाबतीत सामान्य नागरिकांमध्ये विकास करणारा युवा नेता ही प्रतिमा तयार झाली. त्यांच्या या साजेशा कामगिरी बद्दल दखल घेत पुन्हा १५१५ अंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे माजी मंत्री अनंतराव देशमुख, भाजप नेते ॲड नकुल देशमुख (Adv. Nakul Deshmukh) यांच्या या मंजूर करून आणलेल्या निधीमुळे रिसोड व मालेगाव तालुक्यातील अनेक गावातील विकास कामे मार्गी लागणार आहेत. त्यांच्या या विकासक्षम कार्यामुळे रिसोड व मालेगाव विधानसभेतील जनता त्यांचे कौतुक करत आहे.