ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे लातूरच्या अभूतपूर्व विराट सभेत आवाहन
लातूर (Adv. Prakash Ambedkar) : मागील पाच वर्षात एनआरसी, औरंगजेब, टिपू सुलतान व मशिदीच्या स्टेट्स वरून मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. आम्ही औरंजेबच्या मजारवर चादर चढवली आणि हल्ले बंद झाले. आता वेळ आहे मुस्लिम समाजाने निर्णय घेण्याची. उलेमा व मौलवींच्या संघटनांनी आता आपली भूमिका जाहीर करत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावे. तसेच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षण राहणार नाही हे वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केले.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके, लातूर ग्रामीणचे डॉ. विजय अजनीकर, निलंगा येथून मंजुषा निंबाळकर, उदगीर मधून प्रा. शिवाजीराव बेवनाळे, औसा येथील उमेदवार शिवाजी कुंभार यांच्या प्रचारार्थ लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहर
वधानसभा मतदासंघातील उमेदवार विनोद खटके, निलंग्यांच्या उमेदवार मंजुषाताई निंबाळकर, उदगीरचे उमेदवार प्रा. शिवाजीराव बेवनाळे, औसाचे उमेदवार शिवाजीराव कुंभार, लातूर ग्रामीणचे उमेदवार डॉ. विजय अजनीकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. आंबेडकर म्हणाले, पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामीण भागात निवडणुका पार पाडत असताना ओबीसींना आरक्षण राहणार नाही. कुटुंबात एकाने आरक्षणाचा लाभ घेतला तर इतरांना घेता येणार नाही. जनगणना झाली नसल्याने डेटा उपलब्ध नसल्याचे कारण दिले आहे.
नवीन विधानसभा गठीत झाल्यानंतर ठराव घेण्यात येईल. त्याला काँग्रेस पासून भाजपची मान्यता आहे. तुम्ही आरक्षणाच्या यादीतून किक आऊट व्हाल. हा निर्णय ज्यांना मान्य असेल ते भाजप आणि काँग्रेसला मतदान करतील, ज्यांना मान्य नाही, त्यांनी वंचितच्या उमेदवारांना मतदान करावे, नुसतं मतदान करून चालणार नाही, निवडून आणावे लागेल. त्यामुळे उद्याचे आरक्षण टिकवता येईल. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केले.
समतेचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी हे जनतेला फसवत आहेत. मागच्या वेळी संविधान व लोकशाहीचा सार्वत्रिक इश्यू केला. संविधानातील समतेचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून जातो. तो मार्गच संपवला जातोय. हे सगळं थांबवण्यासाठी वंचितचे उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे.