महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात प्रदान
कन्हान (PhD degree) : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर येथुन डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी पूर्ण करणारे ॲडवोकेट प्रेमचंद्र मनसाराम डहाके (Adv.Premchandra Dahake) यांना विद्यापीठाच्या तिसऱ्या राष्ट्रीय दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते (PhD degree) पीएचडी पदवी प्रदान करून सन्मा नित करण्यात आले.
दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि न्यायमुर्ती बी. आर. गवई यांच्या शुभहस्ते त्यांना ही प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. प्रेमचंद्र डहाके (Adv.Premchandra Dahake) यांनी ” रेग्युलेटरी फ्रेमवर्क फॉर मायक्रो स्मॉल ॲ मिडीयम एंटरप्राइजेस इन इंडिया : क्रिटिकल स्टडी ” या विषयामध्ये त्यांनी आपली (PhD degree) पीएचडी पूर्ण केली. या प्रवासात लाभलेल्या मार्गदर्शनासाठी डॉ. मनिष यादव यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
सध्या डॉ. प्रेमचंद्र डहाके (Adv.Premchandra Dahake) हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठ तसेच नागपुर जिल्हा व सत्र न्यायाल यात आपल्या वकिली सेवेत सक्रिय असुन विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या खटल्यांत यशस्विपणे प्रबळ युक्तिवाद सादर करून न्याय मिळवुन देण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या (PhD degree) उल्लेखनीय शैक्षणिक व व्यावसायिक यशाबद्दल विविध क्षेत्रांतुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!