सेनगाव तालुक्यातील कवठा येथे दिली भेट
हिंगोली (Adv. Sachin Naik) : काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अॅड. सचिन नाईक यांनी अनेक गावागावात भेटी दिल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील कवठा येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यांनी काही अडीअडचणी मांडल्या.
ग्रामस्थांनी संवाद साधून मांडल्या अडीअडचणी
अॅड. सचिन नाईक (Adv. Sachin Naik) यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांनी सेनगाव व हिंगोली तालुक्यातील अनेक गावागावात यापूर्वी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे ग्रामस्थ त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधून अडीअडचणी मांडत आहेत. सेनगाव तालुक्यातील कवठा येथे अॅड.सचिन नाईक यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून विविध विषयावर चर्चा केली. यावेळी विनायकराव देशमुख, आत्माराम बुद्रूक, बंडू कोकाटे, दळवी, रमेश बांगर, जगदीश राऊत, राहूल जाधव, माधव चोपडे, भापायांश राऊत, साहेबखाँ पठाण, दत्तराव चोपडे, सचिन राऊत, सारंगधर मिटकर, भास्करराव पोले, भागवत दाहिरे, शुभम दाहिरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे अॅड.सचिन नाईक हे प्रत्येक दिवशी अनेक गावात भेटी देत असताना तेथील समस्याही ऐकूण घेत आहेत. गावागावात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अॅड.सचिन नाईक यांच्यासोबत ग्रामस्थ मुक्तपणे संवाद साधत आहेत.
नुकसानीमुळे अनेक ग्रामस्थ होरपळले
मध्यंतरी १ व २ सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. बर्याच मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यासह अन्य शेती पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून अद्यापपर्यंत नुकसानीबद्दल आर्थिक मदत झाली नाही. अॅड. सचिन नाईक (Adv. Sachin Naik) हे गावोगावी भेट देत असताना प्रामुख्याने नुकसानीबद्दल ग्रामस्थ त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत.