बुलडाणा (Adv. Sanjay Rathod’s birthday) : सामाजिक कार्यात व आरोग्य सेवेत सातत्याने पुढाकार घेणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अँड. संजय राठोड (Adv. Sanjay Rathod) यांच्या वाढदिवसानिमित्त मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिराला बुधवार 21 एप्रिल रोजी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या सदर शिबिराचे उदघाट्न मोताळा नगर पंचायतच्या नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन मामलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ. पारितोश एम.डी. मेडिसिन, डॉ. सुमित भोसले अस्थीरोगतज्ज्ञ, डॉ. जान्हवी मापारी नेत्ररोग तज्ञ, पीआरओ. आमीन तडवी, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष सहभाग घेतला. या शिबीरात एकूण 208 रुग्ण सहभागी झाले होऊन त्याची तपासणी करण्यात आली. या रुग्णापैकी 25 पेशन्ट गोदावरी येथील हॉस्पिटलमध्ये 24 ऑगस्टला उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांत त्यांना उपचार व ऑपरेशन खर्च मोफत देण्यात येणार आहे.
या (Adv. Sanjay Rathod) आरोग्य शिबिरासाठी युवक काँग्रेस मोताळा तालुका यांनी आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला तसेच ग्रामीण रुग्णालय मोताळा यांनीया शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी मिलिंद जैस्वाल, सलीम चुनेवाले, जलील मक्खी, कैलास खर्चे, रवी पाटील, उषाताई नरवाडे, विष्णू शिराळ, रामेश्वर काळंगे, प्रेमकुमार धुरंधर, शेख रफिक, मदन पाटील, भिका घोंगडे, विजू खोंदले, विनोद वानखेडे, राजेंद्र सावळे, भागवत नप्ते, उल्हाल पाटील, श्याम कानडजे व इतर मान्यवर व ग्रामीण रुग्णालय मोताळा आणि गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर्स, कर्मचारी तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.