पुसदमध्ये मुद्रांक मिळत नसल्यामुळे नागरिकांची परवड
पुसद (Pusad stamp sale) : सध्या मोठ्या प्रमाणात मुद्रांकांची विक्री होत असल्यामुळे व दर महिन्याला घेतलेले मुद्रांक अवघ्या काही दिवसातच संपल्यामुळे मुद्रांकचा तुटवडा पुसदमध्ये निर्माण झाला आहे. विशेष करून शंभर रुपयाच्या (Stamp sale) मुद्रांकाची मागणी गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुसद तालुक्याला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन 7000 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्हा गृहनिर्माण विभागामार्फत व जिल्हा परिषदेमार्फत 15 सप्टेंबर पर्यंत यापैकी 50 टक्के घरकुलांना मान्यता देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने सर्वच यंत्रणांना या संदर्भात युद्ध पातळीवर कामाला लावले आहे. पुसद पंचायत समितीमध्ये ही 120 ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांची अर्ज फाईल युद्ध पातळीवर तयार करण्यात येत आहे. तर लाभार्थ्यांना याकरिता शंभर रुपयाच्या (Stamp sale) मुद्रांकावर आम्ही पत्र देणे आहे. यामुळे मुद्रांक खरेदी करण्याकरिता तहसील परिसरात तालुक्यातील असंख्य नागरिकांसह महिलांची गर्दी होत आहे.
अचानक मुद्रांकाची मागणी वाढल्यामुळे (Stamp sale) मुद्रांक विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. तर तालुका कोषागारात मुद्रांक उपलब्ध नाहीत. तर महिन्याभराचा कोटा मुद्रांक विक्रेत्यांनी अवघ्या काही दिवसातच संपवला. त्यांनी तालुका कोषागाराकडे मागणी केली आहे. तो जिल्हा कोषागार मुद्रांक उपलब्ध असेल तर त्वरित ते प्राप्त होतील असा आशावादही काही मुद्रांक विक्रेते व्यक्त करीत आहेत.घरकुलांच्या लाभार्थ्यांकरिता तसेच मुख्यमंत्री लाडली बहीण यांच्या लाभार्थ्यांकरिता मुद्रांक ची गरज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुद्रांकाची खरेदी होत आहे. दि. 10 सप्टेंबर रोजी तहसील परिसरातील मुद्रांक विक्रेत्यांच्या ठिकाणी मोठी गर्दी जमलेली होती. मात्र (Stamp sale) मुद्रांक विक्रेत्यांनी कुलूप बंद करून त्या ठिकाणाहून गायब राहणे पसंत केले हे विशेष तर यामुळे मात्र नाहक नागरिकांची व महिलांची परवड झाली.