T20 World Cup 2024:- T20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 साठीची लढाई सुरूच आहे. 23 जून (रविवार) रोजी किंग्सटाउन येथील अर्नोस वेल मैदानावर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पहिला विजय
ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी 149 धावा करायच्या होत्या, पण त्यांचा संपूर्ण संघ 19.5 षटकात 127 धावांवरच मर्यादित राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला तो गुलबदिन नायब ज्याने चार विकेट घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. यासह अफगाणिस्तानने गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. गतवर्षी विश्वचषकात अफगाणिस्तान संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) ऐतिहासिक द्विशतक झळकावत अफगाणिस्तानकडून सामना हिसकावून घेतला.
खेरच्या क्षणी त्याची विकेट घेत गुलबदिनने ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणले
आता या सामन्यातही ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानकडून सामना हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरच्या क्षणी त्याची विकेट घेत गुलबदिनने ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणले. मॅक्सवेलने 41 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 59 धावा केल्या. याशिवाय मार्कस स्टॉइनिस (११) आणि मिचेल मार्श (१२) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. गुलबदिन नायबने चार बळी घेतले, तर नवीन उल हकने तीन खेळाडूंना बाद केले. याशिवाय अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
अफगाणिस्तानच्या विजयाने गट-१ चे समीकरण रंजक बनले आहे. दोन सामन्यांत दोन विजयांसह भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आता भारताला ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तर त्यांच्या अडचणी वाढतील. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानसाठी मोठी संधी असेल आणि जर त्याने बांगलादेशला पराभूत केले तर ते सुपर 8 मध्ये पोहोचेल. भारताचे उपांत्य फेरीतील स्थान देखील अद्याप पूर्णपणे निश्चित झालेले नाही. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल.
गुरबाज-झद्रान यांनी फलंदाजी करत कमाल केली
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सहा गडी गमावून 148 धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने 49 चेंडूत 60 धावांची सर्वोच्च खेळी खेळली, ज्यात चार चौकार आणि तब्बल षटकारांचा समावेश होता. तर इब्राहिम झद्रानने 48 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. गुरबाज-इब्राहिम यांनी 15.5 षटकांत 118 धावांची भागीदारी केल्याने अफगाणिस्तान संघाला गती मिळाली. या सामन्यात कमिन्सने ऑस्ट्रेलियासाठी हॅटट्रिक घेतली. कमिन्सने रशीद खान, करीम जनात आणि गुलबदिन नायब यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. याआधी बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही त्याने हॅटट्रिक घेतली होती. याशिवाय ॲडम झाम्पाने दोन आणि मार्कस स्टॉइनिसने एक विकेट घेतली.