मानोरा(Washim):- शहराला लागूनच असलेल्या विठोली येथील बुलढाणा अर्बन कॉपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या गोदामात ठेवलेल्या ३० लाख रुपये किमतीचे शेतमाल तुरीचे कट्टे ३२४ व सोयाबीनच्या(soybeans) १८७ कट्ट्यांची अफरातफर बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, कार्यकारी संचालक सुकेश झवर यांच्यासह इतरांनी केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असा फिर्यादी आकाश अनिल देशमुख यांनी मानोरा येथील न्यायालयात(Courts) अर्ज दाखल केला असता न्यायालयाच्या आदेशाने दि. ३१ ऑक्टोंबर रोजी आरोपी विरुध्द विविध कलमान्वये मानोरा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीविरुध्द कलम ३७९, ४२०, ४०६ भादवी गुन्हा दाखल
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार बुलढाणा अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या गोदामात तुरीचे ३२४ व सोयाबीनचे १८७ कट्टे अश्या ३० लाख रुपयांच्या शेत मालाची अफरातफर २७ डिसेंबर २०२१ ते ३ जून २०२४ च्या दरम्यान झाली. या प्रकरणी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, असे अर्ज मानोरा येथील प्रथम वर्गाचे न्यायाधीश यांचेकडे फिर्यादी आकाश अनिल देशमुख यांनी केला होता. या अनुषंगाने न्यायालयाने आरोपी राधेश्याम चांडक, सुकेस झवर, यांच्यासह बुलढाणा अर्बन को – ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक अमोल शिंदे, अकोलाचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी व श्रीकांत डांगे, अनिल राठोड यांच्यासह इतर बुलढाणा अर्बनचे कर्मचारी यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने मानोरा पोलीसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द कलम ३७९, ४२०, ४०६ भादवी गुन्हा दाखल केला आहे.