चिखली(Buldhana) :- चिखली विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी(candidates) अर्ज भरल्यानंतर आज झालेल्या छाननी मध्ये एकूण 42 उमेदवार रिंगणात राहिले आहेत आता अर्ज मागे किती जण घेतात यावर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
वैद्यरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी नमुना 4 प्रसिद्ध
निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ यांनी आज वैद्यरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी नमुना 4 प्रसिद्ध केली. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार म्हणून गणेश उर्फ बंडू श्रीराम बरबडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राहुल सिद्धिविनायक बोंद्रे इंडियन नॅशनल काँग्रेस, एडवोकेट शंकर शेषराव चव्हाण बहुजन समाज पार्टी, श्वेता विद्याधर महाले भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janta Party) आदी राजकीय पक्षाचे उमेदवाराचे नावांमध्ये समावेश असून नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवारांमध्ये खलित अहमद खान तालीम खान जनता दल सेक्युलर, मच्छिंद्र शेषराव मघाडे सोशॅलिस्ट पार्टी इंडिया सौ. रेणुका विनोद गवळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, विजयकांत सांडू गवई रिपब्लिकन सेना, सिद्धार्थ अशोकराव वानखेडे आझाद समाज पार्टी कांशीराम, सिद्धेश्वर भगवान परिहार वंचित बहुजन आघाडी तर अपक्ष उमेदवारांमध्ये अब्दुल रियाज अब्दुल समद सौदागर ,अब्दुल वाहिद शेख इस्माईल, अविनाश निंबाजी गवई, देवानंद पांडुरंग गवई, नरहरी ओंकार गवई, नाजेमा नाज इम्रान पठाण, नासिर इब्राहिम सय्यद ,नितीन रंगनाथ राजपूत, प्रशांत पुरुषोत्तम ढोरे, बबन डिगांबर राऊत, मनोज सारंगधर लाहुडकर, मिलिंद कुमार सुधाकर मघाडे, डॉक्टर मोहम्मद रहीस उस्मान मोहम्मद, मृत्युंजय संजय गायकवाड, सौ रजनी अशोक हिवाळे, रवींद्र नारायण डाळिंबकर ,राजेंद्र सुरेश पडघान, राहुल जगन्नाथ बोंद्रे ,राहुल प्रल्हाद बोर्डे ,विजय मारुती पवार, विनायक रामभाऊ सरनाईक अंभोरे, शरद दिगंबर चेके पाटील, शरद रमेश खपके, शेख मुनवर शेख इब्राहिम ,शेख सईद शेख मुस्ताक बागवान, सतीश जीवन पंडागळे, सतीश मोतीराम गवई ,सिद्धार्थ अंकुश पैठणे, संजय धोंडू धुरंदर ,संतोष रमेश उबाळे आदी अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.