गडचिरोली(Gadchiroli):- जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडा धबधब्याखाली आंघोळीला उतरलेले नवनीत राजेंद्र धात्रक (वय २७) रा. चंद्रपूर हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा व त्यांना वाचविण्यास गेलेले त्यांचे जावई ग्रामसेवक बादल शामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवणीत सोबत धबधब्यात(waterfall) उतरलेली नववधू वेळीच बाहेर आल्याने ती बचावली.
काळाने नववधू मयुरी चा अवघ्या 5 दिवसात केला संसार उध्वस्त
पंचायत समिती अंतर्गत मौजापल्ली ग्रामपंचायमध्ये कार्यरत ग्रामसेवक बादल हेमके व त्यांचे साळे नवनीत धात्रक हे कुटुंबियासह बिनगुंडा धबधब्यावर काल ११ जून रोजी मंगळवारी आले होते.नवनीत धात्रक यांचा गेल्या आठवड्यात ७ जून रोजी विवाह (marriage) झाला होता . नवविवाहित दांपत्य लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी बिनागुंडा धबधब्यावर गेले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथील घटना
सुरवातीला नवदांपत्य नवणीत व मयूरी हे धबधब्यात उतरले. त्यानंतर नवनीत बुडायला लागला. तर मयुरी यांना पोहता येत नसल्याने त्या धबधब्यातून बाहेर निघाल्या. नवनीत डुबत असतांनाच त्यांनी भाऊजी वाचवा अशी आर्त हाक मारली. साळ्याला वाचवीण्यासाठी ग्रामसेवक बादल यांनी धबधब्यात उडी मारली. बादल यांना पोहता येत नसल्याने धबधब्याजवळ असलेल्या सर्वांनी त्यांना धबधब्यात उडी न मारण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी न ऐकल्याने त्यांचा देखील बुडून मृत्यू (Death)झाला.
नातेवाईक हे सर्व दृश्य आपल्या डोळ्यांनी बघत होते
सोबत असलेले इतर नातेवाईक हे सर्व दृश्य आपल्या डोळ्यांनी बघत होते मात्र त्यापैकी कोणालाही पोहता येत नसल्याने कुणीही धबधब्यात उतरले नाही. या धबधब्यावर यापूर्वी देखील एका डॉक्टराच्या करून अंतासह काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. दुर्गम आदिवासी भागातील बिनागुंडा पर्यटन स्थळ हे नक्षलग्रस्त असल्याने पूर्णतः दुर्लक्षित आहे. याठिकाणी गाईड वा सुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसल्याने असे अपघात घडत आहेत.