गडचिरोली(Gadchiroli):- तेंदूपत्ता संकलनाकरीता जगंलात गेलेल्या मजूरावर रानटी हत्ती (Wild elephants) ने हल्ला केल्याची घटना ताजी असताना पुन्हा तेंदुपत्ता मजुरावर रानटी डूकराने हल्ला चढवल्याने मजूर गंभीर जखमी (seriously injured) झाल्याची घटणा चारभट्टी जवळ असलेल्या कोटलडोह चा जगंलात आज दि १५ मे बूधवार रोजी सकाळी ८.३० वाजेचा सूमारास घडली.
चारभट्टी येथील मजूर रतिराम तूळशीराम नरेटी वय ५३ हे सहकारी मजूर व कूटूंबातील इतर सदस्यासह कोटलडोह गावाशेजारील जगंलात तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना अचानक रानटी डूकराने त्यांचावर हल्ला चढविला यावेळी त्यानी बचावाकरीता आरडा ओरड केल्याने सहकारी मजूरानी मदतीकरीता घटणास्थळाकडे धाव घेतली त्यामूळे डुक्कर तिथून पळून गेला मात्र या हल्ल्यात नरेटी गंभीर जखमी झाले.
त्यांचा हात व पायावर खोल व गंभीर दूखापत (Serious injury) झाली आहे. त्यांचावर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचारा नंतर प्रकृती गंभीर असल्याने पूढील उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्नालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान पूराडा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र(Forest area) अधिकारी दिघोरे यानी उपजिल्हा रूग्णालयात भेट देत जखमीची विचारपूस करीत आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.