मणिपूर(Manipur):- मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात रविवारी सकाळी कुकी आणि मेतेई समुदायांमधील जातीय संघर्षामुळे ग्रामीण स्वयंसेवकांमध्ये गोळीबार (firing) झाला. या प्रकरणाची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्याजवळील टेकड्यांवरून इम्फाळ खोऱ्यातून कौत्रुक गावावर अनेक डझन लोकांनी अंदाधुंद गोळीबार (Indiscriminate firing) केल्याची घटना घडली.
या अंदाधुंद गोळीबारामुळे काही गोळ्यांनी गावकऱ्यांच्या घराच्या भिंती तोडल्या, महिला, लहान मुले आणि वृद्ध लोकांना जवळच्या सुरक्षित ठिकाणी हलवले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, ‘पम्पी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्टारचे गोळे देखील गावात डागले जात आहेत, ज्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा गोळीबार
हल्ल्यानंतर, कौत्रुक गावातील स्वयंसेवकांनीही प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे गोळीबार झाला, असे पोलीस अधिकारी म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा कर्मचारी या भागात पाठवले जात आहेत. मात्र, वृत्त लिहेपर्यंत चकमक सुरूच होती, असे पोलिसांनी सांगितले. मणिपूरमध्ये २६ एप्रिलला पहाटे २.१५ वाजता दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या (CRPF) 128 व्या बटालियनचे(Battalion) दोन जवान शहीद झाले. नरसेना परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुकी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.
गेल्या वर्षीपासून युद्ध सुरू आहे
मणिपूरमध्ये गेल्या वर्षी ३ मे रोजी कुकी आणि मेतेई या दोन जातींमध्ये संघर्ष सुरू असताना जातीय हिंसाचार(violence) झाला. त्यानंतरही हा संघर्ष थांबलेला नाही. गाव हे हल्ल्यासाठी अतिसंवेदनशील भागांपैकी एक मानले जाते. गेल्या वर्षी 3 मे पासून, इम्फाळ खोऱ्यातील मेईटी आणि जवळच्या टेकड्यांमधील कुकी यांच्यातील जातीय संघर्षात 200 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो बेघर झाले.