परभणी/जिंतूर (Parbhani):- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक(Facebook) पोष्ट करून शिवीगाळ केल्या प्रकरणी अज्ञात फेसबुक चालवणाऱ्यावर जिंतूर पोलिसात विविध कलमानुसार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना विविध मार्गाने बदनाम करण्याचे प्रकार
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मागील दीड वर्षांपासून विविध आंदोलन करत आहेत आंदोलनास वाढता पाठिंबा पाहता सदरील आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना विविध मार्गाने बदनाम करण्याचे प्रकार समोर येत आहेत.असाच प्रकार मागील चार पाच महिन्यापासून ओबीसी (OBC) समाज जिंतूर तालुका या फेसबुकवरून बदनामीकारक फोटो व मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होते. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अश्लील शिवीगाळ (Abusing)करणे फोटो मोर्फ करणे यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम सातत्याने चालू होते. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवण्यासाठी पर्यन्त चालू आहेत म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या फिर्यादीवरून ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुक पेज चालवणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.




