हिंगोली(Hingoli):- राज्यातील नगरपालिका / नगरपंचायतीमधील कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी/ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी/ कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात विधानसभा निवडणुकीच्या कामकाजावर तसेच निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबतचा इशारा यापूर्वी संघटनेने शासनाला दिलेला आहे.
विधानसभा निवडणूक कामावर बहिष्कार घालण्याचा संघटनेचा इशारा
आज 15 ऑगस्ट रोजी हिंगोली नगरपालिका इमारतीसमोर विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचे बॅनर(banner) लावून कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध असंतोष प्रकट करण्यासाठी निदर्शन व धरणे आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली या कार्यक्रमात नगरपालिका हिंगोली च्या कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला यावेळी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ घुगे, जिल्हा अध्यक्ष बाळू बांगर, मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय शिखरे सह सफाई विभागातील व कार्यालयीन विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.