– पवन जगडमवार
नांदेड (Agricultural Bazar Samiti) : जिल्ह्यात यंदा ८ हजार ७११ हेक्टरवर शेतकर्यांनी (Groundnut Farmers) उन्हाळी भुईमुग पिकाची पेरणी केली होती. भर उन्हाळ्यात राबराब – राबुन रक्ताचे पाणी करुन पिकविलेल्या उन्हाळी भुईमुग शेंगाला मात्र नांदेडच्या (Bazar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कवडीमोल भाव तर मिळतच आहे. परंतू कट्टिच्या नावाखाली प्रतीक्विंटल ९ ते १० किलो कट्टि आकारुन व्यापार्यांकडून शेतकर्यांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार २४ मे रोजी शुक्रवारी उघडकीस आला आहे. कट्टि देण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांना आपला माल परत नेण्याची वेळ आली होती.
कट्टिच्या नावाखाली व्यापार्याकडून प्रतीक्विंटल ९ ते १० किलोची लुट
आठ दिवसाखाली प्रतिक्विंटल ६ हजार ७४५ रूपये ते ५ हजार ५१५ रूपयाचा भाव मिळत होता. प्रतिक्विंटला ६ किलो कट्टि घेतली जायची.परंतू आता आवाक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. शुक्रवारी शेकडो शेतकरी टेम्पो,टॅक्टर मध्ये उन्हाळी भुईमुग विक्री करण्यासाठी (Bazar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माल विक्रीसाठी आणला असता व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाची बोली लावत,प्रतिक्विंटल ९ ते १० किलो कट्टिची मागणी सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध केल्याने व्यापाऱ्यांनी (Groundnut Farmers) भुईमुग खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी सकाळ पासून व्यापाऱ्यांच्या प्रतिक्षेत होते. परंतू हवा तसा दर तर मिळतच नव्हता परंतू कट्टिच्या नावाखाली होत असलेली लूट थांबवा,ज्यांचा माल चांगला आहे त्याच्या मालाची खरेदी करा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र सरसकट कट्टिची मागणी व्यापारी करीत होते. कट्टिच्या नावाखाली लूट केल्यास उत्पादन्न खर्च ही निघणार का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला होता. कारण भुईमुगाला ५ हजार ते ६ हजार ७९० रूपयाचा कवडीमोल भाव मिळत असताना परत कट्टि आकारली जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पैशाची जुळवाजुळव
जून महिना अवघ्या काही दिवसावर आला असल्याने खरीप हंगामासाठी शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत. यंदा अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुग शेंगाची पेरणी केली. हेच भुईमुगांची विक्री करून मिळालेल्या पैशातून खरीपाची पेरणी करावी यासाठी जिल्ह्यातील शेतकरी ट्रॅक्टर, टॅम्पो द्वारे (Groundnut Farmers) उन्हाळी भुईमुग शेंगा नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून शेकडो शेतकरी भुईमुग शेंगा घेवून (Agricultural Bazar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. परंतू खरीपाच्या पेरणीसाठी शेतकर्यांना पैशाची गरज असल्याने शेतकर्यांच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी अडवणूक सुरू केली.
यापूर्वी १ क्विंटलला ६ किलो कट्टि आकारली जात होती. परंतू मागील काही दिवसापासून (Groundnut Farmers) भुईमुगाची आवक वाढल्यामुळे शेतकर्यांच्या मालाचे भाव पाडून, प्रतीक्विंटल ९ ते १० किलो कट्टि मिळावी यासाठी व्यापार्यांकडून शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे. याला शेतकर्यांनी विरोध केल्यामुळे शुक्रवारी एकाही व्यापार्याने शेतकर्यांचा माल खरेदी केला नाही. त्यामुळे शेकडो शेतकर्यांना आणलेला माल परत घरी नेण्याची वेळ आली होती. त्यामुळे शेतकर्यांना माल वाहतूकीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. परंतू याकडे संबंधित (Agricultural Bazar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील (Groundnut Farmers) भुईमुग उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देवून शेतकर्यांना ८ ते ९ हजार रुपयांचा भाव द्यावा आणि कट्टिच्या नावाखाली होत असलेली लुट थांबवावी, अशी मागणी शेतकर्यांतुन होत आहे.
माती असेल तर व्यापार्यांनी कट्टि लावावी पण माल चांगला असतांनाही फुली द्या म्हणून प्रत्येक पोत्याला पुन्हा ३ किलोची कट्टि मागणी करुन व्यापारी शेतकर्यांची अवडणूक करीत आहेत.
– शेतकरी, नागेश विठ्ठलराव ढगे, रा. महाटी, ता.मुदखेड, जि.नांदेड.
मार्केट कमिटीचे पदाधिकारी व व्यापारी हे सर्व मिळून शेतकर्यांची पिळवणूक करीत आहेत. यापूर्वी प्रतीक्विंटलला ६ किलोची कट्टि घेतली जात होती, पण आता पुन्हा ३ किलोची कट्टि मागणी करुन अडवणूक होत आहे. यामुळे सकाळपासून बीट थांबवले आहे. त्यामुळे बाहेर गावाहुन माल घेऊन आलेल्या शेतकर्यांचे हाल होत आहेत.
– शेतकरी, तुकाराम सखाराम पोहरे, रा.पिंपरी महिपाल नांदेड