हिंगोली (Agricultural Bazar Samiti) : कृषि उत्पन्न बाजार समितीचा मोंढा शुक्रवारी शिरेहक शाह बाबा संदल निमित्त बंद ठेवण्यात आला होता. त्याच प्रमाणे पहगाम येथील (Agricultural Bazar Samiti) घटनेप्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे आज शनिवारी हिंगोली जिल्हा बंदची हाक दिली आहे. तसेच रविवारी शासकीय सुट्टी असल्याने सलग तीन सुट्यांमुळे मोंढ्यात शुकशूकाट जानवत आहे.
२५ एप्रिल शुक्रवार रोजी शिरेहक शहा बाबा संदल निमित्त जिल्हाधिकार्यांनी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे हिंगोलीच्या कृउबासमध्ये भुसार मार्केट बंद ठेवण्यात आले होते. २६ एप्रिलला पहलगाम येथील (Agricultural Bazar Samiti) घटनेप्रकरणी जिल्हा बंदची हाक दिल्याने आजही मोंढ्यात शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव नारायण पाटील यांनी दिली. या बंदमुळे मोंढ्यात सन्नाटा दिसून आला.