हिंगोली (Agricultural Committee) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce) यार्डामध्ये व्यापार्यांचा शेती माल ठेवला जात असल्याने शेतकर्यांचा आलेला शेती माल रस्त्यावर उतरवावा लागत आहे. त्यातच भुईमुगाची कट्टी घेतली जात असल्याने शेतकर्यांनी (Bazar Samiti) बाजार समितीच्या कामकाजाविरूद्ध संताप व्यक्त केला आहे.
सध्या मोंढ्यामध्ये भुईमुगाची शेंग व हळदीची आवक अधिक वाढली आहे. ८ जून रोजी जुन्या मोंढ्यामध्ये भुईमुगाची आवक झाली होती. यार्डामध्ये (Hingoli Farmer) शेतकर्यांचा शेती माल ठेवण्यात आल्याने शेतकर्यांना रस्त्यावर भुईमुगाचे पोते उतरवावे लागले. त्यामुळे शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. वजन मापाकरीता जवळपास दोन ते तीन दिवसापासून मुक्काम ठोकावा लागत आहे. (Agricultural Committee) शेती मालाचा लिलाव दिरंगाईने होत असून व्यापार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
कट्टी थांबवावी अन्यथा आंदोलन
त्यातच ज्या व्यापारी व आडत्यांनी खरेदी केलेला शेती माल त्याचे वजनमाप त्याच दिवशी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुईमुगात माती असल्याचा आरोप बाजार समितीने करून वजनमाप व लिलाव करण्याकरीता दिरंगाई केल्याचा ठपका जवळा बु.येथील दशरथ आंबादास शिंदे या शेतकर्याने (Agricultural Committee) बाजार समितीवर ठेवला आहे. सध्या पाऊस पडत असल्याने भर पावसात शेतकर्यांचा माल रस्त्यात आणि व्यापार्यांचा माल शेडमध्ये हा प्रकार दुप्पटीपणा असल्याचा करण्यात आला आहे. त्यातच एका पोत्यामागे एक किलो कट्टी लावली जात असल्याने शेतकर्यांचे शोषण करण्यात येत असल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे बाजार समितीने लक्ष घालून शेतकर्यांचा माल शेडमध्ये उतरवावा तसेच (Hingoli Farmer) शेती मालाची होणारी कट्टी थांबवावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.