नाईक बंगल्यात आमदारांचा जनता दरबार, मात्र सोईस्करपणे आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष!
पुसद (Agricultural hunger strike) : राज्यातील शेतकरी कारखानदार झाला पाहिजे असे स्वप्न उराशी बाळगणारे दुष्काळाच्या काळात अवघ्या काही दिवसात महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंभू बनविले नाही तर जाहीर फाशी घेण्याची घोषणा करणारे हरितक्रांतीचे प्रणेते तब्बल अकरा वर्षाच्या वर महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करणारे तर ज्यांच्या योजना देशाने नवेस्तर जगानेही त्याचे अनुकरण केले असे पुसद चे भूमिपुत्र तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या गृह तालुक्यातच शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनागोंदी कारभाराने कळस गाठला असून चक्क पगारी साठी व विविध मागण्यांसाठी गेल्या 22 जुलैपासून पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील आवारात लेखापाल ते चपराशी अशा तब्बल 16 जणांनी प्रथम थाटले, अनेक शिष्टमंडळे या दरम्यान त्यांना भेटली संचालक मंडळासह सचिव उपसभापती या सर्वांनी भेटी दिल्या इतकेच नव्हे तर सचिव शिवाजी मगर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे दैनिक देशोन्नतीला सांगितले होते. हे विशेष तर कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, व पगारी होणार नाहीत ग्रॅज्युटी ची रक्कम पूर्णपणे भरल्या जाणार नाही.
शिवाय काही दिवसा अगोदरच लेखापाल हामद यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या विधवा पत्नीला ही बाजार समितीच्या या गदारोळात कुठलीही आर्थिक मदत व पती मेल्यानंतर चे पैसे दिल्या गेलेले नाहीत. हे अत्यंत खेदजनक व दुर्दैवी गोष्ट आहे. तर या उपोषण दरम्यान दैनिक देशोन्नतीने प्रत्यक्ष भेट दिली असता. कर्मचाऱ्यांनी पैसे अभावी कुटुंबाचे पालन पोषण शिक्षण करणे अवघड होऊन बसले असून अक्षरशः डोळ्यात पाणी आणले. तरी या निगरगट्ट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव उपसभापती व संचालकांना पाझर फुटला नाही, तर पुसद मध्ये माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे एड निलय नाईक यांनीही याकडे दुर्लक्षच केलेले आहे. तर काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आ. डॉ. वसाहत मिर्झा हे सध्या पुसदला राहतच नसल्यामुळे त्यांना पुसदच्या नागरी समस्यांचे घेणं देणं नसल्याचे दिसत आहे. तर विद्यमान पुसदचे लोकप्रतिनिधी महायुती सरकार मध्ये सामील असलेले अजित दादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. इंद्रनील मनोहर नाईक यांनीही गेल्या अनेक दिवसांपासून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलेले आहे. तर दि 5ऑगस्ट रोजी पुसदच्या नाईक बंगल्यामध्ये आ.इंद्रनील नाईक यांनी जनता दरबार भरून अनेक नागरिकांच्या समस्या ऐकल्यात, व ते सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी मगर व सहाय्यक जिल्हा निबंधक सुनील भालेराव यांनी आमदारांसोबत बंद द्वार चर्चा केलेली आहे. दुर्दैव पुसदचे असंच या गंभीर बाबीकडे बघितल्यानंतर म्हणावसं वाटतं.