माजी सभापती भाऊराव तुमसरे ठरले विजयाचे शिल्पकार
तुमसर/भंडारा (Bazar Samiti Election) : बहुप्रतिक्षित तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti Election) निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने हातमिळवणी करून (Baliraja panel) बळीराजा जनहित पॅनल स्थापन केला होता. या पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन करून त्यांचे १० संचालक निवडून आणलेत. १८ संचालक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आ.राजू कारेमोरे यांच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनल व माजी आमदार चरण वाघमारे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जय किसान महाविकास पॅनलचा दारुण पराभव केला. यात आ.राजू कारेमोरे यांचे पॅनलचे चार व चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलचे तीन संचालक निवडून आले. एका अपक्ष संचालकाने येथे बाजी मारली.
१८ पैकी दहा संचालक निवडून आणत सत्ता कायम ठेवली
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आ.राजू कारेमोरे यांच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे चार तर भाजपचे माजी आ.चरण वाघमारे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जय किसान महाविकास पॅनलचे तीन व अपक्ष एक, असे १८ संचालक निवडून आले आहेत. ही (Bazar Samiti Election) निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व अटीतटीची झाली. विद्यमान आ.राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे व बळीराजा जनहित पॅनलकडून भाऊराव तुमसरे, माजी खा.शिशुपाल पटले, राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
आजी, माजी आमदारांच्या पॅनलचा पराभव
निवडणुकीत(Bazar Samiti Election) विजयी झालेले उमेदवार : सेवा सहकारी संस्था गट : बळीराजा जनहित पॅनलचे भाऊराव तुमसरे, रामदयाल पारधी, किरण अतकरी, डॉ.हरेंद्र रहांगडाले, डॉ.अशोक पटले, प्रमोद कटरे, वैशाली पटले, राजेश पटले, अविरोध गणेश बावणे, जय किसान महाविकास पॅनलचे रामप्रसाद कटरे, शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे शारदा गाढवे यांचा समावेश आहे.