बच्चु भाऊ कडु यांच्या प्रयत्नांतुन साकारलेले अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण सभागृह” लोकार्पणासाठी तयार
अचलपूर (Agricultural Research Center) : स्थानिक कृषी संशोधन केंद्राला शेतकत्यांना प्रशिक्षण देण्याकरीता सभागृह उपलब्ध झाले आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संचालित सदर संशोधन केंद्राला परतवाडा ते अंजनगाव मार्गावर टुमदार इमारतीचे बांधकाम आणि रंगरंगोटीचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर सदर नवीनतम इमारत शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाकरिता वापरली जाणार आहे.
तत्कालीन राज्यमंत्री तथा अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी यांच्या हस्ते आणि डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू व्ही एम भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२१ मध्ये सदर इमारतीची मुहूर्तमेढ रोवली होती.सदर इमारत आत्ता पूर्ण झाली असून इमारतीच्या पुढील भागाचे काँक्रीटीकरण केले जात आहे. अचलपूर आणि चांदुर बा या दोन्ही तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर असलेल्या संत्राबगा मागील ५ वर्षापासून संकटात आहे.हा संत्रा पट्टा भकास होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या तापमानाचा परिणाम विविध पिकांवर आणि उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे या (Agricultural Research Center) संशोधन केंद्रातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन भेटले पाहिजे, जेणेकरून भरघोस आणि दर्जेदार उत्पन्न मिळेल,असा सूर उमटत होता.
सदर (Agricultural Research Center) संशोधन केंद्रामध्ये कृषी बाबत संशोधन आणि मार्गदर्शन केले जाते. लिंबूवर्गीयवर्गिय फळे,तेलबिया,भाजीपाला, केळी,धान्य आदी पिकांच्या विविध वाणांवर संशोधन केले जाते आणि सर्व कसोट्यांवर पात्र झालेल्या वाणांच्या बियाण्यांच्या प्रमानिकरणासाठी पुढील सोपस्कार पूर्ण करून त्याबाबत कार्य केले जाते.अंजनगाव आणि चिखलदरा, धारणी मार्गालगत संशोधनकार्य करण्याकरिता शेकडो एकर मौल्यवान जमीन सदर केंद्राच्या मालकीची आहे. याच इमारतीमध्ये इंग्रजकालीन खुणा आजही कायम असून १५० वर्षे लादलेल्या गुलामगिरीची साक्ष देत आहे.
या परिसरात अनेक वर्षानंतर शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी (Agricultural Research Center) हक्काची वास्तू उभी झाली असल्याने अनेक वर्षे असलेली उणीव या इमारतीमुळे दूर झाली आहे. माजी आ. बच्चू कडू (Bachu Kadu) यांचा शेतकऱ्यांच्या भरागोस उत्पन्न वाढीसाठी आणि त्यातून आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी असलेला दुरदृष्टीकोन स्पष्ट होत असल्याचे शेतकरी बोलतात.