तहसीलदारांना मनसेचे निवेदन
मानोरा (Agricultural Seva Kendra) : आजुबाजुच्या जिल्ह्यामध्ये बोगस बियाणेचा (Bogus seed) जोर चालू आहे. मानोरा तालुक्यामध्ये सुद्धा बोगस बियाणेची चर्चा सुरू आहे तसेच शेतकऱ्यांना हमीभावने बी बियाणेचे जादा पैसे मोजावे लागत आहे. मनसेचे तालुका अध्यक्ष मनोज खडसे यांनी तहसीलदारांना सांगितले की, यापुढे माझ्या तालुक्यामध्ये बोगस बियाणे येता नये, त्यासाठी (Agricultural Seva Kendra) कृषि सेवा केंद्राची चौकशी करावी, असे निवेदन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना मनसेचे पदाधिकारी यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, कास्तकाराने घेतलेल्या (Bogus seed) बी बियाणेचे त्यांना पक्के बिल देण्यात यावे, (Agricultural Seva Kendra) कृषि सेवा केंद्रात उपलब्ध माल आहे कीतीव विकला कीती यांची पुर्ण माहितीचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी मनसेचे पदाधिकारी मनोज खडसे , ईंदल राठोड, अनिल भारसाकडे, संतोष घोडे, कुंदन खडसे, यश गावंडे, प्रमोद ठाकरे, प्रकाश भारसाकडे, प्रणव ठोबंरे, ज्ञानेश्वर राठोड, सागर मुडगंळे, मयुर गायकवाड, अक्षय पवार, शुभम गायकवाड, अभय भारसाकडे आदी उपस्थित होते.