आठशे हेक्टरवर बीजोत्पादन
परभणी (Agricultural University) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आठशे हेक्टर जमिनीवर बीजोत्पादन केले जात आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर बीजोत्पादन घेतले जात असून विद्यापीठाची जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे. या बाबत कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी माहिती दिली.
विद्यापीठाने बीजोत्पादन २० हजार क्विंटल करण्याचे लक्ष ठेवले आहे. विद्यापीठाच्या बियाणातून पिकाचा उतार देखील अधिक येत आहे. विद्यापीठाने विविध पिकामध्ये वेगवेगळे वाण विकसित केले आहेत. फळ, बागायती बी-बियाणे देखील उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रावर लागवडीसाठी शिफारस देखील करण्यात आली आहे. विद्यापीठ विकसित बियाणे हे किड प्रतिरोधक तसेच कमी पावसात तग धरणारे आहेत.
बियाणांना शेतकर्यांची पसंती
वनामकृवि विकसित विविध पिकांच्या वाणाच्या दर्जेदार बियाणास शेतकर्यांमध्ये मोठी मागणी आहे. सोयाबीन, तुर, ज्वारी आदी वाणास शेतकरी बांधवांची विशेष पसंती आहे. विद्यापीठातील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन घेतले जाते. निधी, मनुष्यबळ अभाव पूर्ण क्षमतेने बीजोत्पादन होत नाही. विद्यापीठातील जमीन वापराखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान व इतर बाबींची माहिती दिली जात आहे. मराठवाड्या सारख्या भागात (Agricultural University) विद्यापीठ विकसित बियाणांचा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे दिसत आहे.