कृषी मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर कृषी सहाय्यक गंभीर जखमी सरपखेड फाट्यावरची घटना
रिसोड (Agriculture Board Officer Death) : टँकर ने दुचाकी स्वराला चिरडल्याने एका कृषी मंडळ अधिकाऱ्याचा घटनास्थळी मृत्यू तर कृषी सहायक जखमी झाल्याची घटना दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता च्या दरम्यान रिसोड मेहकर मार्गावर ग्राम सरपखेड फाट्याजवळ घडली.विलास बारबैले वय 55 असे मृतक कृषी मंडळ अधिकारी चे नाव तर प्रवीण पुनिलवार वय 36 असे जखमीचे नाव असुन या घटनेने कृषी विभागात शोक व्यक्त केला जात आहे.
सदर घटना ही रस्ता कामातली अनियमितता व ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे झाली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून, सदर रस्ता काम सुरू झाल्यापासून या रस्त्यावर सातत्याने नाहक बळी जाण्याची मालिका सुरूच आहे. यापूर्वी (Agriculture Board Officer Death) मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात दोन जणांना या रस्त्यावर आपला जीव गमावा लागला होता तर अनेक जणांना या ठिकाणी दुखापत व अपंगत्व आलेले आहे.
मागील दोन वर्षापासून सदर रस्त्याचे काम सुरू असून अद्यापही रस्त्याचे निम्मे कामही झालेले नाही. पुन्हा किती दिवस रस्ता काम सुरू राहणार असा प्रश्न आता सामान्य नागरिकांकडून विचारला जात असून सदर रस्त्या कामाबाबत नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे. (Agriculture Board Officer Death) याबाबत माहिती अशी की, कृषी मंडळ अधिकारी विलास बारबैले व कृषी सहाय्यक प्रवीण पुनीतवार हे दोघेही रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथुन हरभरा, संत्रा आदी पिकावर कीड पाहणी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दुचाकी क्रमांक एम एच 29 बि.2817 ने परतत होते. यादरम्यान सरपखेड फाट्यावर रस्ता कामात वापरला जाणारा टँकर क्रमांक एम एच 50 एन 2463 मध्ये अपघात झाला या अपघातामध्ये कृषी मंडळ अधिकारी बारबैले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पुनितवार हे गंभीरित्या जखमी झाले.त्यांना प्रथम रिसोड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी ते नांदेड येथे रवाना झाले आहे. पोलिसांनी सदर टँकर रिसोड पोलीस स्टेशन येथे जमा केले.
याप्रकरणी मृतक यांचा पुतण्या विलास बारबैले यांच्या फिर्यादीवरून टँकर चालक संदीप वाठोरे रा वडजी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रिसोड पोलीस करत आहे.
सदर घटनेतील मृतक विलास बारबेले हे अमरावतीचे रहिवासी होते तर जखमी प्रवीण पुनीतवार हे नांदेड येथील आहेत. बारबैले हे रिसोड भाग एक येथे कृषी मंडळ अधिकारी म्हणून काम पाहत होते तर प्रवीण पुनीतवार हे एकलासपूर व मोठेगाव मध्ये कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहाता जिल्हाकृषी अधिक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी रिसोड ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली.
विनोद भुतेकर यांचे घटनास्थळी मोलाचे सहकार्य
सदर घटना डोळ्यासमोर घडताच मेहकर कडे काम निमित्ताने जात असताना विनोद भुतेकर यांनी घटनेची माहीती तात्काळ रूग्णवाहीका,व पोलिसांना दिली,घटनास्थळा वरून टॅक चालक फरार झाल्याची माहीती सुध्दा पोलिसांना भुतेकर यांनी दिली.आपघातातील मृतकाच्या अंगावर कपडा टाकुन झाकण्याचे काम विनोद भुतेकर यांनी करीत माणुसकीचा प्रत्येय दिला.कारण इतर लोक फक्त बघ्याची भुमीका घेत होते.




