कारंजा/वाशिम (Agriculture Department) : शहरासह ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रात (Agricultural Seva kendra) कपाशीचे विशिष्ट वाण दिले जात नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात असतानाच (Karanja taluka) कारंजा तालुक्यात कपाशी बियाण्यांच्या विशिष्ट वाणाचा तुटवडा या शीर्षकाखाली दैनिक देशोन्नतीने 10 जून रोजीच्या अंकात अग्रक्रमाने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने करंजा तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे यांनी त्याच दिवशी दुपारी कारंजा शहरातील (Agricultural Seva kendra) कृषीसेवा केंद्रांची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना स्टॉक असल्यास कपाशी बियाण्याची विक्री करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच जादा दराने विक्री केल्यास कारवाई करणार असल्याचे देखील सांगितले.
देशोन्नती वृत्ताची दखल, जादा दराने विक्री केल्यास कारवाई
कपाशी बियाण्याचे विशिष्ट अपेक्षित वाण शहरासह ग्रामीण भागातील (Agricultural Seva kendra) कृषी सेवा केंद्रात मिळत नसल्याने शेतकऱ्यांना लगतच्या तालुक्यात बियाणे खरेदीसाठी जावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी 864 रुपयांच्या कपाशी बियाण्याच्या बॅगसाठी अधिकची रक्कम मोजावी लागत असल्याचेसुद्धा शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कृषी सेवा केंद्र संचालकांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून, त्यांच्या दुकानातून खते व बियाणे घेणाऱ्यास कपाशी बियाण्याचे विशिष्ट वाण दिले जाते अन्यथा उपलब्ध नाही, असे सांगितले जाते. तर काही कृषी सेवाकेंद्रात जादा दराने कपाशीच्या बियाण्याच्या विशिष्ट वाणाची विक्री केली जात आहे. त्यामुळे कपाशीच्या बियाण्याचे विशिष्ट वाण खरेदीसाठी शेतकऱ्यांची पंचाईत होत असल्याने, (Agriculture Department) कृषी विभागाने कपाशीचे विशिष्ट वाण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
…तर करणार कारवाई
सोमवारी कारंजा तालुका (Karanja taluka) कृषी अधिकारी रवींद्र जटाळे यांनी कारंजा शहरातील कृषी केंद्रांची झाडाझडती घेतली असता, त्यांनी दुकानदारांना स्टॉक उपलब्ध असल्यास बियाणे विक्री करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणत्याही दुकानदाराकडून जादा दराने बियाण्याची विक्री केली जात असल्यास शेतकऱ्यांनी (Agriculture Department) कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले. तक्रार केल्यास तपासणीअंती जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.