अमरावती(Amravati):- विभागीय कृषी (departmental agriculture) सहसंचालक कार्यालय हे कृषी विभागातील भ्रष्टाचाराचे वटवृक्ष बनले असून येथील भ्रष्ट कारभाराची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. नुकत्याच लाचलुचपत विभागाच्या कारवाईने हे भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आले असून झालेल्या कारवाईत एक लिपिक अडकला असला तरी यात अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहे.
ट्रॅपमधून बडया अधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता
कृषीविभागाचा(agriculture department) पाच जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या विभागीय कृषि सहसंचालक कार्यालय निव्वळ पैसा गोळा करण्याचा अड्डा बनला असून विविध गैरमार्गातून या कार्यालयात महिन्याला करोडोंची उलाढाल होते. त्यासाठी या कार्यालयातील बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना त्यांची पात्रता नसतानाही त्याला प्रतिनियुक्तीवर दाखवून विशेष टेबलवर बसविण्यात आले आहे. कार्यालयात एकप्रकारे पैसा गोळा करण्यासाठी रॅकेट तयार करून कृषीविभागतीलच सर्वसामान्य कर्मचाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे उकडण्यात येते. गेल्या दीड दोन वर्षांपासून हा नवा ट्रेंड जेडीए (JDA)कार्यालयात पहावयास मिळत आहे. अशाच एका करवाईतून सुटका मिळविण्यासाठी झालेल्या व्यवहारातून जेडीए कार्यालयाचा एक लिपिक ट्रॅपमध्ये अडकला.
कर्मचाऱ्यांवर कारवाई करतांना त्याला लाच घेण्यास बाध्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेणे आवश्यक
ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई थांबणार होती त्या अधिकाऱ्यांकडूनच या पैश्यांची देवाण घेवाण होणार होती हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या कटात या कार्यालयातील अनेक बडे अधिकारी सहभागी असून या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे खालच्या कर्मचाऱ्याला रक्कम स्वीकारायला लावून बळीचा बकरा बनविले असल्याची चर्चा कृषीविभागात सुरू आहे. या कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्याच्या केबिन यासाठी राखीव असून या केबिनमध्ये बदल्यापासून, कर्मचाऱ्यावरील कारवायांपर्यंतचे सर्व व्यवहार पार पाडले जातात. एका लिपीकला(clerk) कारवाई रोखण्याचे कोणतेही अधिकार नसतांना एका लाखाची लाच मागणे अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्यच नाही. त्यामळे एका सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर कारवाई (action) करतांना त्याला लाच घेण्यास बाध्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अशा काही अधिकाऱ्यांनी आपली नावे समोर येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न चालविले असल्याचे विश्वसनीय वृत्त असून रात्रभर हे अधिकारी एकत्र बसून मिळेल त्या ठिकाणावरून सेटिंग लावण्याच्या प्रयत्नात होते. या कार्यालयातील प्रशासन अधिकारी हे पद जणू शासकीय वेतन घेऊन अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी निर्माण केले की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
एजंट सुटीवर असल्यानेच लागला फास
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात पैसे गोळा करण्यासाठी एका एजंटची नियुक्ती केली आहे. तो या कामात पारंगत असल्याने पात्र नसतांनाही त्याला मलाई लाटण्याचा टेबल देण्यात आला आहे. ट्रॅप पडला त्या दिवशी नेमका तो सुटीवर असल्याने हे काम दुसऱ्याकडे देण्यात आले अन लाच स्वीकारण्याचा फास गळ्याशी लागला.
अनेक कारवाया थंडाबसत्यात
यवतमाळ जिल्ह्यातील 19 लाख रुपयांचे साहित्य न खरेदी करता काढलेली बिले, परभणी येथील तत्कालीन एसएओ ने बोगस कागदपत्रांच्या आधारे उपभोगलेली वैदयकीय रजा अशा अनेक कारवाया विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने थंडाबसत्यात टाकल्या असून कर्मचाऱ्यांवर मात्र शुल्लक कारणासाठी कारवायांचा बडगा उचलून त्यांच्याकडून अशाप्रकारे पैसे उकडल्या जात आहे.