घरातील ज्वारीचा दाना बेपाऱ्याला विकल्यावर खरेदी सुरु करणार काय?
अमरावती (Agriculture Department) : जिल्हयातील सिंचनाची व्यवस्था (Irrigation system) असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीचा पेरा केला. ज्वारीचे पिक उत्तम असुन एकरी १५ ते २० क्विंटल ज्वारी उत्पादीत होत आहे. शासनाचा हमीभाव प्रती क्विंटल ३१८० रुपये असतांनाही अद्यापही खरेदी केंद्र सुरु न झाल्याने (Sorghum farmers) ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात ही ज्वारी १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणतात की, घरातील ज्वारीचा दाना बेपाऱ्याला विकल्यावर खरेदी सुरु करणार काय ? असा प्रश्न संतापून व्यक्त करत आहे.
शासकिय हमी भावाने ज्वारी खरेदी (Sorghum Procurement) करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया १३ ते ३० दरम्यान सुरु करण्यात आली आहे. बहुतांश (Sorghum farmers) ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी सुध्दा केली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्वारी खरेदीला प्रारंभ झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी आवश्यक खर्चाला अनुसरुन ही ज्वारी खुल्या बाजारात विक्री करावी लागत आहे. शासनाने तत्काळ ही ज्वारी खरेदी प्रारंभ करावी, अशी मागणी केली आहे. (Agriculture Department) अचलपूर कृषी विभागाअंतर्गत (Achalpur Taluka) अचलपुर तालुक्यात ७८८.५० हे., अंजनगांव सुर्जी ९२१ हे. दर्यापूर ३२०.६०, चिखलदरा १४०, धारणी ११३ असे एकुण २२८३.१० हेक्टर पैकी १६५७.९० उन्हाळी तर ६२५.२० हेक्टरवर ज्वारीचा पेरा आहे. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असल्याने शासनाने ही (Sorghum Procurement Centre) ज्वारी खरिदी केंद्र तत्काळ सुरु केल्यास होणार नाही.
शेतात ज्वारीचे पिक ,ई पिक पेरा नोंदणीसाठी हेलपाटे
बहुतांश ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात उन्हाळी ज्वारी पेरलेली आहे. शासकिय (Sorghum Procurement Centre) ज्वारी खरेदी केंद्रावर नोंदणी करतांना ई-पिक पेरा करणे आवश्यक आहे. हस्तलिखीत सातबारा हा ग्राह्य धरल्या जात नाही त्यामुळे तलाठ्यांनी ई पिक पेरा नोंदणीच्या माध्यमातून ज्वारी पिकाची नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ई पिक नोंदणी साठी तलाठ्याकडे चकरा माराव्या लागत असुन (Achalpur) तालुक्यातील बऱ्याच तलाठ्यांनी ई पिक नोंदणीची प्रक्रिया प्रारंभ केली आहे.
७० हजार क्विंटल ज्वारी खरिदीचे लक्ष, लवकरच खरिदी सुरु
अमरावती जिल्हयात उन्हाळी ज्वारी खरेदी करीता नोंदणी प्रारंभ झाली आहे.जवळपास ७० हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे लक्ष आहे. नोंदणी अधिक झाल्यास ज्वारी खरिदीचा लक्षांक शासन स्तरावरुन वाढवून घेण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी व लवकरच (Sorghum Procurement) ज्वारी खरिदी प्रारंभ केल्या जाईल.
– अजय बिसने, जिल्हा मार्केटींग अधिकारी, अमरावती
ज्वारीच्या पेऱ्यात व उत्पादनातही वाढ
अचलपूर उपविभागा अंतर्गत २२८३.१० हे. ज्वारीचा पेरा करण्यात आला आहे. एकरी उत्पादन ही चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे (Sorghum Procurement) ज्वारी खरेदीचा लक्षांक वाढविणे गरजेचे राहणार आहे.
– रविंद्र वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी, अचलपूर
यावर्षी शेतात उन्हाळी ज्वारीचा पेरा केला होता. उत्पादनही चांगले झाले. मात्र बाजारात ज्वारीला योग्य भाव नाही त्यामुळे नोंदणी केली मात्र आता खरेदी केव्हा होणार याची प्रतिक्षा आहे. घरचा ज्वारीचा दाना बेपाऱ्यांना विकल्यावर केंद्र सुरु झाले तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होणार नाही. उन, हवा, पाण्यात कष्ट करत ज्वारीचे पिक आम्ही काढायचे बेपाऱ्याला त्याचा मेवा मिळत असेल शेतकऱ्यांसाठी योग्य नाही.
– सुभाष कडू, शेतकरी जवळापूर