पुसद (Pusad Bazar Samiti) : एकेकाळी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये अवे इमारत बांधण्यात आली होती सदर इमारत काँग्रेस भवन म्हणून ओळखल्या जात असल्याचे म्हणत होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राज्यकर्त्यांच्या अनास्थीमुळे अमूल्य जागेमध्ये उभी असलेली ही इमारत धुळ खात बसलेली आहे. या इमारतीचं आजही योग्य दुरुस्ती व व्यवस्थापन केल्यास एखादं चांगलं शासकीय कार्यालय जे अनेक कार्यालयात (Pusad Bazar Samiti) पुसद मध्ये भाड्याने आहेत ते तिथे स्थापन करू शकता आले असते.
मात्र शहरामध्ये अशा अनेक इमारती शासनाच्या धुळखात पडलेल्या आहेत. अनेक शासकीय कार्यालय लाखो रुपयाच्या भाड्याच्या खोल्यांमध्ये विस्थापित झाले आहेत. काही ठिकाणी विशेष करून कामानिमित्त जाणाऱ्या महिलांना व त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी महिलांना कुठलेही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत हे अत्यंत खेदजनक आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक त्यांनीच आता गांभीर्याने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन शहरासह तालुक्याचा विकास साधने आवश्यक आहे हे विशेष.