अहेरी (Aheri) : मागील चार दिवसात स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाशी (Sub-District Hospital) संबंधीत असलेल्या दोन नवजाताना घरी व दवाखान्यात जन्म दिल्यानंतर पुन्हा उपचारासाठी आणल्यानंतर संबंधित रोगाचे फिजिशियन दवाखान्यात उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यासाठी सांगितल्यानंतरही घरी घेऊन गेलेल्या व गडचिरोली येथे रेफर केलेल्या अशा दोन मातांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली.
प्रकृती खालावल्याने पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले
सरिता तोटावार, 24, राहणार चिंचगुंडी व नागुबाई कोडापे ,23 वडलापेठ अशी मृत मातांची नावे आहेत. मृत्त सरिता ही हृदय रोगाशी (Heart disease) निगडित आजारी असल्याची माहिती आहे. तीन मे ला उपचारानंतर दवाखान्यात फिजिशियन नसल्याने रेफर करण्याची सूचना असतानाही रुग्ण नातेवाईकांनी घरी घेवून गेल्यानंतर तिची प्रसूती झाली. मात्र नंतर प्रकृती खालावल्याने पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यावेळी तिचा मृत्यू हृदयविकाराने घरीच झाल्याची माहिती आहे. दवाखान्यात याची पोस्टमार्टम व पोलीस पंचनामा सुद्धा झालेला आहे.
रुग्ण नातेवाईकांचा हलगर्जीपना
मृत्तक नागूबाई ,23 एप्रिलला प्रसूतीनंतर दोन दिवसांनी सुट्टी झाली . नंतर 13 दिवसांनी प्रकृती जास्त खालवल्याने पुन्हा भरती झाली. मात्र फिजिशियन (Physician) नसल्याने गडचिरोली येथे रेफर केल्यानंतर तिचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटनेच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) फिजिशियनची गरज असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावी असे रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे. उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ गडचिरोली येथे प्रतिनियुक्तीवर आहे. नेत्रतज्ञ (Ophthalmologist) सुद्धा नाही. जिल्ह्यात एकमेव कान नाक घसा तज्ञ गडचिरोली येथे आहे. अहेरी उपविभागातील पाच तालुक्यांतील (Taluks) नागरिकांना काननाक घशाचे आजार होत नाही का ? असा प्रतीप्रश्न नागरिक विचारत आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयात तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची 30 पैकी दहा पदे रिक्त आहेत.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सुद्धा चार पदे रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांवर, रोगांवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. कोट उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक कन्ना मडावी. यांच्यामध्ये दोन्ही मतांचा मृत्यू दवाखान्यात झालेल नाही. एका रुग्णाच्या नातेवाईकांनी रेफर सांगितल्या नंतरही स्वमरजीने रुग्णांला घरी घेऊन गेल्यानंतर तर दुसरा गडचिरोली येथे मृत्यू झाल्याची माहिती दिली.