माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह 240 प्रवासी
अहमदाबाद (Ahmedabad Plan Crash) : आज दुपारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ एक मोठा अपघात झाला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटविकला जाणारे (Air India) एअर इंडियाचे विमान AI171 (बोईंग 787-8, नोंदणी VT-ANB) उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. (Ahmedabad Plan Crash) विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू असे एकूण 242 लोक होते.
#WATCH Rescue and relief operations are underway at the site of the Air India plane crash in Ahmedabad
A green corridor to transport injured passengers for treatment and to hospitals is being established. pic.twitter.com/oUfpTc7VTB
— ANI (@ANI) June 12, 2025
विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल (8200 तासांचा उड्डाण अनुभव) आणि सह-पायलट क्लाईव्ह कुंदर (1100 तासांचा अनुभव) यांनी केले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मते, विमानाने धावपट्टी 23 वरून दुपारी 1:39 वाजता IST (08:09 UTC) उड्डाण केले. उड्डाणानंतर, (Ahmedabad Plan Crash) विमान जमिनीवर कोसळले. ATC ला MAYDAY कॉल देण्यात आला, परंतु त्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले, त्यानंतर घटनास्थळावरून दाट काळा धूर आणि मलबा दिसू लागला. माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (CM Vijay Rupani) हे देखील विमानात होते.
एनडीआरएफ पथके पोहोचली घटनास्थळी
अपघातानंतर आपत्कालीन सेवा तात्काळ सुरू करण्यात आल्या. गांधीनगरहून 90 कर्मचाऱ्यांसह सात अग्निशमन दल तसेच (NDRF) एनडीआरएफच्या तीन पथके आणि वडोदराहून अतिरिक्त तीन पथके घटनास्थळी पाठवण्यात आली. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) किंजरापु यांनी ट्विट केले की, अहमदाबादमध्ये झालेल्या (Ahmedabad Plan Crash) विमान अपघातामुळे मला धक्का बसला आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व एजन्सींना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव आणि वैद्यकीय मदत सुनिश्चित केली जात आहे.
अमित शाह यांनी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांशी केली चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. (Air India) एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “आम्ही (Ahmedabad Plan Crash) अपघाताची माहिती तपासत आहोत आणि लवकरच अधिक माहिती शेअर करू.”
पंतप्रधान मोदींनी घेतली अपघाताची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याशी चर्चा केली आणि हवाई दलाची माहिती घेतली. (Ahmedabad Plan Crash) अहमदाबादमध्ये विमान अपघाताची घटना. मंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले की ते बचाव आणि मदत कार्याचे निरीक्षण करण्यासाठी अहमदाबादला जात आहेत. (PM Narendra Modi) पंतप्रधानांनी मंत्र्यांना तातडीने सर्व आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत आणि परिस्थितीबद्दल नियमित अपडेट ठेवण्यास सांगितले आहे. सर्व संबंधित एजन्सी हाय अलर्टवर आहेत आणि समन्वित प्रयत्न सुरू आहेत.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे (Air India) ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. (Ahmedabad Plan Crash) उड्डाणादरम्यान ते विमानतळाच्या भिंतीशी आदळले आणि आग लागली.