प्रयोगशाळेचा अहवाल!
अहमदपूर (Ahmedpur) : अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका शेतकऱ्याच्या 4200 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने नव्हे तर थंडीमुळे झाल्याचा अहवाल प्रयोग शाळेने दिला आहे. यामुळे पशुवैद्यक अधिकाऱ्यांचा (Veterinary Officer) अंदाज खरा ठरला आहे. ढाळेगावात 4200 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सर्वप्रथम देशोन्नतीने दिली होती. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते. यानंतर प्रशासनाने (Administration) मृत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्या प्रयोगशाळेचा (Laboratory) स्वयं शस्पष्ट अहवाल आला असून त्यात सदरील 4200 पक्षी हे अस्वच्छता व थंडीमुळे गुदमरून मृत झाल्याचे म्हटले आहे. यामुळे अहमदपूर तालुका व परिसरात कुठल्याही प्रकारची बर्ड फ्लूची लागण झाली नसल्याचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भूपेन बोधनकर यांनी सांगितले.
चिकन व अंडी शिजवून खाल्ल्यास बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका नाही बर्ड फ्लूच्या साथीच्या भीतीने अनेकांनी चिकन व अडी खाण्याचे टाळले होते. त्यामुळे व्यापाऱ्यातही नाराजीचा सूर दिसून येत होता मात्र पशुवैद्य प्रयोगशाळेचा अहवाल आल्यामुळे सदरील चिकन व अंडी हे शिजवल्यानंतर त्यात बर्डचा फ्लूचा कुठलाही अंश राहत नाही किंवा त्याचा संसर्ग होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.