नांदेड (AIMIM Andolan) : विशालगढ गाजापूर येथील रजा मस्जिद वरील आंतकवादी हमला आणि (Muslim community) मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात एआयएमआयएम (AIMIM Agitation) पक्षाच्यावतीने शुक्रवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत धार्मिक स्थळावरील होणारे हल्ले बंद करावेत, मुस्लिम समाजावार होणारा अत्याचार थांबवावेत, गाजापूर येथील मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्यपालकडे करण्यात आली. या (AIMIM Andolan) आंदोलनात शेकडो मुस्लिम समाजबांधव (Muslim community) सहभागी झाले होते.