मिनेक्स मेटलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड तसेच रॅन केमिकल कारखाना बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी
कळमेश्वर (Air pollution) : कळमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत निमजी व आष्टीकला आणि इतर गावा लगतच्या परिसरातील (Chemical factory) मिनॅक्स मेटलर्जिकल प्रायव्हेट लिमिटेड तसेच रॅन केमिकल या कारखान्यातून होत असलेल्या प्रदूषित पाणी तसेच विषारी वायू प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक तसेच शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीतील निघणाऱ्या धुरामुळे शेत पिकाचे व नागरिकांच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, निघणाऱ्या या (Air pollution) प्रदूषित धूरामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊन श्वास घेण्यास त्रास होत आहे.
याबाबत अनेकदा कंपनीच्या प्रशासनाकडे तसेच तालुका जिल्हा आणि (Pollution Control Corporation) प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप कंपनी वर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. कंपनी प्रशासनाकडून दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्यानंतरच ते बाहेर सोडणे आवश्यक असते. परंतु हे दूषित पाणी सर्रासपणे बाहेर सोडले जात आहे. त्यामुळे कारखान्यातील दूषित पाणी लगतच्या विहिरीत व बोरवेल मधील देखील झीरपले जात आहे. त्याचप्रमाणे कंपनीतून निघणाऱ्या विषारी काळा कुट्ट धूर लगतच्या शेती परिसरातील कापूस संत्रा मोसंबी व इतर भाजीपाला पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.
यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन समस्या मांडल्या. (Polluted water) दूषित पाण्याचा उग्र वास तसेच कारखान्याच्या चिमनीतून निघणारा धोकादायक धुरामुळे शेती पिकावर होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकीकडे नैसर्गिक आसमानी सुलतानी संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांवर कंपनीच्या धुरामुळे मोठा परिणाम झाला आहे. या विरोधात आजूबाजूचे शेतकरी एकवटले असून, या कारखान्याबाबत संबंधित विभागाने दखल घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे (Chemical factory) कारखान्याच्या विरोधात जिल्हाधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरुपात शेतकरी व नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. कारखान्यामुळे आरोग्य पर्यावरण पाणी शेती या धोका उत्पन्न झाल्याने सदर कारखाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने कारवाईचे घोंगडे भिजत पडले आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रकाश भोयर, विनोद भोयर, विलास कडू, संदीप बनसोड, श्याम भोयर, विलास तेलंगराव ,किशोर भोयर, प्रकाश राऊत,वासुदेव भोयर, राजू भोयर,विलास वाकळ ,बबली कड्डी, अजाब भोयर, ललित ठाकरे ,अरुण भोयर, लीलाधर बांबल , प्रकाश इंगोले , प्रकाश भोयर , भगवान ठाकरे यांच्यासह गावातील शेकडो नागरिकांनी सह्या करून तक्रारी केलेल्या आहेत प्रशासनाकडे कारवाईबाबत लक्ष लागलेले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्याच्या तपासणी कडे दुर्लक्ष
निमजी व आश्टिकला परिसरातील मिनॅक्स मेटेलर्जीकल तसेच रँक केमिकल (Chemical factory) या कारखान्याला परवानगी देताना पर्यावरण विभाग ग्रामपंचायत प्रशासनाने व आरोग्य विभागाने आवश्यक बाबी तपासणी गरजेच्या होत्या कारखान्यातून निघणाऱ्या (Polluted water) दूषित पाण्याचे व्यवस्थापन तसेच निघणाऱ्या धुराचा परिसरातील पिकांवर परिणाम झाल्याने कारखाने प्रशासनावर प्रशासकीय कामानुसार नोंदी आवश्यक असताना प्रशासनाकडून याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने, जिल्हा प्रशासन तसेच (Air pollution) प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा प्रकाश भोयर, वासुदेव भोयर, ललित ठाकरे, अनिल डेहनकर, लीलाधर बांबल, बळवंत भोयर, दिलीप भोयर , धनराज भोयर, पुंडलिक कडू , योगेश भोयर, विलास वानखेडे, अशोक भोयर, भगवान ठाकरे , समीर डेहनकर, सचिन चौधरी, गिरीश भोयर आदींनी दिला आहे.
ग्रामपंचायतच्या ठरावालाही टाकले कचऱ्याच्या टोपलीत
दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 12 वाजता सरपंच वनिता कांतेश्वर तेलंगराव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृह निमजी येथे कंपनीतून होणाऱ्या (Air pollution) प्रदूषणाबाबत सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मीनेक्स मेटलर्जीकल प्रा. लि. व रँन केमिकल कंपनीकडून होत असलेल्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकांचे नुकसान तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या हानीमुळे कंपनी प्रशासनाने यावर त्वरित अंमलबजावणी करून आवश्यक ती साधने वापरून धूर कमी करावा, अशा बाबतचा ठराव करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठरावाला केराची टोपली दाखवत कुठलीही कारवाई कंपनी प्रशासनावर आजपर्यंत करण्यात आली, नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दोन्ही कंपनीकडून होत असलेल्या (Chemical factory) प्रदूषणामुळे इको सेन्सिटिव्ह झोन नॅशनल पार्क, वन्यजीव अभयारण्य ,बायोस्फियर रिझर्व वाइल्ड लाईफ प्रभावित होत असून, हा प्रकल्प दहा किलोमीटर अंतरावर येत नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन्ही कंपन्यांना दिले आहे परंतु निमजी गावाला लागूनच मोठ्या प्रमाणात जंगल असून या जंगलात वाघ बिबट्या हरणे आणि इतर जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने या प्रकल्पापासून जंगल जमीन वन्यजीव अभयारण्य तसेच कंपनी पासून दहा किलोमीटर असलेल्या राष्ट्रीय गोरेवाडा प्राणी उद्यान प्रभावित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे निमजी, आष्टी ,खापरी, केतापार ,कळंबी, सेलू, गोंडखैरी ,लोणारा, गुमथळा, सावंगी ,उपरवाही तसेच हिंगणा तालुक्यातील व्याहाड ,पेठ ,मंगरूळ ,नेरी, धामणा आदी गावातील नागरिकांवर तसेच शेतकऱ्यांवर या (Air pollution) प्रदूषणाचा परिणाम होत असून, निसर्गासह आरोग्याची हानी होत आहे. त्यामुळे जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी हा कारखाना त्वरित बंद करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.