दुबई (Aishwarya Rai Best Actress Award) : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) हिची गणना टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. अलीकडेच या अभिनेत्रीला ‘पोनियिन सेल्वन: II’ साठी (Poniyin Selvan: II) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कार (Best Actress Award) प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात अभिनेत्रीची मुलगी (Aaradhya Bachchan) आराध्या बच्चनही दिसली. दुबईमध्ये SIIMA 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ऐश्वर्या राय बच्चनला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अभिनेत्रीच्या या खास यशानिमित्त तिची मुलगी आराध्याही तिच्यासोबत उपस्थित होती.
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर येताच अभिनेत्रीने भाषणाला सुरुवात केली. यादरम्यान त्यांची मुलगी आराध्याने तो क्षण आपल्या फोनमध्ये कैद केला. ऐश्वर्याला हा (Best Actress Award) पुरस्कार मिळाल्यावर आराध्या खूपच उत्साहित होती. ऐश्वर्या स्टेजवर भाषण देत असताना, (Aaradhya Bachchan) आराध्या हातात फोन घेऊन संपूर्ण क्षण टिपताना दिसली.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये (Aishwarya Rai) ऐश्वर्या काळ्या अनारकलीच्या सेटमध्ये खूपच छान दिसत होती. तर या कार्यक्रमात ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी (Aaradhya Bachchan) आराध्या बच्चन चंदेरी चमकदार को-ऑर्डर सेटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय आई आणि मुलगी दोघांनीही रेड कार्पेटवर एकमेकांसोबत पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर खूप प्रेम दाखवले. या खास क्षणाचे खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर चाहते आराध्या बच्चनच्या लूकचे कौतुक करत आहेत. (Aaradhya Bachchan) आराध्या तिची आई ऐश्वर्या रायपेक्षा जास्त सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. चमकदार पोशाखातील ही आई-मुलगी जोडी खूप पसंत केली जात आहे. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बहुतेक सर्व कार्यक्रमांमध्ये तिची मुलगी आराध्यासोबत दिसते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे पती अभिषेक बच्चन तिच्या यशाच्या निमित्ताने तिच्यासोबत नव्हते.