जयंत महाजन
भाजपने चांगल्या चांगल्यांना ‘थप्पी’ला लावले आहे, याचा अनुभव अजून दादांना आलेला नाही. ‘पवार विरुद्ध पवार’ या लढाईत भाजपने त्यांना पाठिंबा दिला असला, तरी एक पवार पराभूत केल्याचे समाधान भाजपच्या ‘आतल्या’ गोटात व्यक्त होत असेल, याचे भान दादांना असेल का?
‘तू कसा निवडून येतो बघतोच’, असे अनेक मतदारसंघांत जाऊन तेथील आमदारांना दमबाजी करणार्या दादांना अचानक तोंड लपविण्याची वेळ आली. कारण दादांना मुलाला व पत्नीलाही निवडून आणता आले नाही, त्यामुळे त्यांच्या ‘दादा’गिरीच्या भाषणाची संपूर्ण राज्यात खिल्ली उडवायला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील (Maharashtra) अतिशय घातक राजकारणाने ‘अजित’ दादा आता ‘पराजित’ दादा झाले. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) चार पैकी अवघा एकच खासदार निवडून आला व त्यांचा स्ट्राइक रेट २५ टक्के जाहीर झाला. त्यामानाने एकनाथ शिंदे यांनी बर्यापैकी कामगिरी केल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक लढतींकडे जनतेचे लक्ष होते; पण विशेष करून बारामतीकडे अनेकांचे डोळे लागले होते. देशातील संसदीय निवडणूक पार पडली व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मोठ्या प्रमाणावर मानहानिकारक पराभव झाला. दोन पक्ष फोडल्यामुळे भारतीय जनता पक्ष खूश होता; परंतु निकालामुळे त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. शिवसेना फोडून देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यावर राष्ट्रवादी (Nationalist) फोडण्याची गरज नव्हती, असं बोललं जात होतं; पण सुडाने पेटलेले देवेंद्र फडणवीस किती ‘खतरनाक’ आहेत, याची महाराष्ट्राला जाणीव झाली. शरद पवार नावाची व्यक्ती संपल्याशिवाय महाराष्ट्रात गुजरात, मध्यप्रदेश सारखी परिस्थिती निर्माण करता येणार नाही, याची जाणीव भाजपच्या दिल्लीतील (Delhi) नेत्यांना फडणविसांनी करून दिली. त्यांनीदेखील जे जे करता येईल ते करावे, यासाठी वरदहस्त दिला. म्हणूनच मध्य प्रदेशमध्ये एका जाहीर सभेत ‘एनसीपी’ म्हणजे ‘नॅशनल करप्ट पार्टी’, त्यातच या पार्टीचे नेते अजितदादा यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला, असे दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना सांगावे लागले; मात्र तीनच दिवसांनी अजितदादांनी बंड पुकारून सरकारमध्ये शपथ घेतली व महाराष्ट्रात एक वेगळाच संदेश जाऊन पोहोचला.
दुसरीकडे बारामतीत (Baramati) चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘शरद पवार यांना संपवायचे’ हाच आमचा हेतू आहे, हे जाहीर सांगितल्यानंतर बारामतीच नव्हे; तर महाराष्ट्र (Maharashtra) खडबडून जागा झाला. त्यामुळेच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळाच संदेश राज्यातील जनतेत पोहोचला. शरद पवारांना ‘टार्गेट’ करा, असा संदेश वरूनच आल्याने व त्यातच आयता ‘घरभेदी’ मिळाल्याने भाजपा ‘मोगॅम्बो’प्रमाणे खूश होता. विजय कोणाचाही होवो याच्याशी जनतेला काही घेणे- देणे नसते; पण या निवडणुकीत ‘शरद पवार’ ही व्यक्ती भाव खाऊन गेली. वयाच्या ८४ व्या वर्षी २२ दिवसांत ५२ सभा या माणसाने गाजवल्या. सर्वात जास्त विश्वास ज्या व्यक्तीवर ठेवला त्यांनी पक्ष, चिन्ह, जीवाभावाची माणसे नेल्यावरही शून्यातून उभे करणे, याला सार्यांनीच राजकीय जोडे बाजूला काढून सलामच करायला हवा. शरद पवारांच्या राजकीय खेळ्या, डावपेच व ते चुकीचे की बरोबर याबद्दल निश्चितच मतमतांतरे होतील; परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्रच (Maharashtra) नव्हे तर देशभरात त्यांच्याबद्दल सर्वाधिक सहानुभूती व पाठिंबा आहे हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही. त्यानी अवघे दहा उमेदवार उभे केले व आठ विजयी करून दाखविले. महाराष्ट्रातील त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट ८० टक्के आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही हे येथे नमूद करावे लागेल. बारामतीच्या (Bharamati) अंगणात ‘नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी’ अशी लढाई आहे, असा प्रचार भाजपनं करायला सुरुवात केली; पण बारामतीच्या जनतेला ते काही पटत नव्हतं. कारण त्यांच्या समोरच ‘पवार विरुद्ध पवार’ राजकारण कमालीचे पेटले होते.
पैशांचा मोठ्या प्रमाणावर ‘जाळ’ झाल्याच्या बातम्या राज्यात पसरत होत्या. पवार कुटुंबात फूट पाडल्याची शिक्षा जनतेने फडणवीस यांना म्हणजेच भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील निवडणुकीत (State elections) अजितदादांनी शरद पवारांना ‘टार्गेट’ केल्याचे जनतेला पटलेच नाही. पितृस्थानी असलेल्या व राजकीय जन्मदाता असूनही जी भूमिका अजितदादांनी घेतली तीच जनतेला आवडली नाही. सुनेत्रा पवार यांचा व्यक्तिगत पराभव झालेलाच नाही, तर अजितदादांना दिलेली ही चपराक आहे. शरद पवार बरोबर असताना हेच अजितदादा वेळोवेळी ‘नॉटरिचेबल’ (Notarable’) राहून त्यांची नाराजी व्यक्त करायचे. आता त्यांचे हे ‘लाड’ कोण करणार? पक्ष आणि सर्वोच्च पद हातात येत नसल्याचं लक्षात येताच दादांनी भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि थेट सत्तेत गेले; पण जनतेत अतिशय वाईट संदेश पोहोचला होता. त्याचाच फटका लोकसभेला बसला व विधानसभेला काही वेगळा निर्णय होईल असे दिसत नाही. यानंतर दादांपुढे मोठं आव्हान असेल.
विधानसभेला (Assembly) बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित किंवा युगंधर पवार, असा सामना होऊ शकेल. तेथेही पराभव झाला तर दादांना आयुष्यभर भाजपच्या आदेशानुसारच वागावे लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारामतीकरांचा राग अजूनही गेलेला दिसत नाही. त्याचा परिणाम त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांवर होणार आहे. म्हणूनच सध्या मंत्री छगन भुजबळ यांच्यासारखे अनेकजण महायुतीबरोबर आहेत की महाविकास आघाडीबरोबर, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम्ा निर्माण झाला आहे. सध्या तरी दादा देशात ‘एनडीए’चे सरकार आले, याच ‘उसन्या’ आनंदात आहेत; परंतु आपले योगदान त्यात किती हे ते लक्षात घ्यायला तयार नाही. भाजपने चांगल्या चांगल्यांना ‘थप्पी’ला लावले आहे, याचा अनुभव अजून दादांना आलेला नाही. ‘पवार विरुद्ध पवार’ या लढाईत भाजपने त्यांना पाठिंबा दिला असला, तरी एक पवार पराभूत केल्याचे समाधान भाजपच्या ‘आतल्या’ गोटात व्यक्त होत असेल, याचे भान दादांना असेल का?