परभणी/पाथरी ( Ajit Pawar) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पक्षाचे उमेदवार आ .राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी बुधवारी मानवत येथे आले असता निवडणूक विभागाच्या पथकाने त्यांनी हेलिकॉप्टर मध्ये आणलेल्या बॅगची तपासणी केली .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बुधवार १३नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ . राजेश विटेकर यांच्या प्रचाराला निमित्त विजय संकल्प सभा घेण्यासाठी आले होते .यावेळीरत्नापूर कॅम्प येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅड वर मानवत व पाथरी येथील निवडणूक भरारी पथकाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बॅगची तपासणी केली .पथकामध्ये निवडणूक सहाय्यक खर्च निरीक्षक व्ही . पी .जाधव, सीव्हीजीएल पथकातील पथक प्रमुख नायब तहसीलदार पाथरी गंगाधर येल्हारे ,धनंजय पवार,नारायण शिंदे यांचा समावेश होता.