पुसद (Ajit Pawar) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा दोन्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या संकल्पनेतून राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये “मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेअंतर्गत ” राज्यातील अनेक महिलांना रक्षाबंधनाच्या पर्वावर अर्थमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar) दोन महिन्याचे पैसे अर्थात तीन हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वळते केले आहेत. लाडक्या बहिणी तांत्रिक अडचणीमुळे व केवायसी मुळे वंचित राहिल्या आहेत.
मात्र मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनाचा सण राज्यातील विद्यमान महायुती सरकारने गोरगरिबांच्या घरामध्ये साजरा केला याचा आनंद महिला साजरा करीत असताना दिसत आहेत. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री हे पुसद मध्ये आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी आज सकाळी दहा वाजता च्या दरम्यान पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार (Ajit Pawar) गटाचे मोठे नेते प्रफुल पटेल, कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री सुनील तटकरे हे पण त्यांच्या समवेत असणार असल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांच्या सूत्रांकडून कळलेली आहे.
सदर योजना राबविण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद विधानसभा मतदारसंघ अव्वल ठरला आहे हे विशेष. आ. इंद्रनील नाईक तथा त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार गटाचे जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यासह राज्य शासनाचे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी महिला अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक ग्रामसेविका तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार या सर्वांच्या जनजागृतीमुळे सदर योजना पुसद तालुक्यामध्ये अत्यंत यशस्वी ठरलेली आहे हे विशेष.