लोकसभा निवडणुकीपूर्वी पत्नी सुनेत्रा पवार यांना ‘क्लीन चिट’
मुंबई (Mumbai) : लोकसभा निवडणुक 2024 याआधी (LokSabha Elections) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बारामतीच्या (LokSabha Elections) लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांना 25 हजार कोटी रुपयांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी (Mumbai Police) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) क्लीन चिट दिली आहे.
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणात सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिला आहे. या टीमला MSCB बँक घोटाळा प्रकरणात कोणतेही गुन्हेगारी कृत्य दिसले नाही. या प्रकरणात ईओडब्ल्यूने (Ajit Pawar) अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि इतरांना क्लीन चिट दिली. कर्ज देणे आणि साखर कारखान्याची विक्री, या संपूर्ण प्रक्रियेत बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही.