वसमत येथील विराट सभेत अजित दादा पवार यांचे आश्वासन
वसमत/हिंगोली (Ajit Pawar) : आमदार राजू पाटील नवघरे (Raju Navghare) हा विकासासाठी धडपडणारा तरुण आहे तो सभापती होता तेव्हाच मी त्याचे काम पाहून त्याला आमदार करणार असे ठरवले होते व आमदार केले आता त्याचा विकासाचा झंझावात पाहता व त्याची तळमळ पाहता त्याला मी फक्त आमदार ठेवणार नाही तर मंत्री करून टाकतो असे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले वसमत येथे बुधवारी जन सन्मान यात्रा आली होती. यावेळी विराट जाहीर सभा पार पडली या सभेला उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केले.
वसमत येथे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑगस्ट रोजी जनजन्मान यात्रा आली होती या यात्रेच्या निमित्ताने वसमत तिथे विराट जाहीर सभा पार पडली
सभेसाठी (Ajit Pawar) अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे, (Raju Navghare) आमदार राजू पाटील नवघरे, रूपाली चाकणकर, आमदार राजेश विटेकर, जिल्हाध्यक्ष बि.डी बांगर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
त्या सभेत आमदार राजू पाटील नवघरे (Raju Navghare) यांनी प्रास्ताविक करताना वसमत विधानसभा मतदारसंघासाठी अजितदादा पवार यांनी सढळ हाताने निधी दिला त्यामुळे मतदारसंघाचा विकास साधला आहे अजित दादा पवार यांच्यामुळे मतदार संघात एमआयडीसी सिंचन प्रकल्प रस्ते पूल यासारख्या योजना उभ्या करता आल्या महिला तरुण शेतकरी यांचा विकास अतुल दादा मुळे करता आला त्यामुळे आपण अजित दादा पवार यांच्यासोबत आहोत व यापुढे अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली वसमत मतदारसंघाचा विकासाचा रथ पुढे जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी धडाकेबाज भाषण केले यावेळी बोलताना अजित दादा पवार (Ajit Pawar) यांनी आमदार राजू पाटील नवघरे यांच्या विकासाच्या तळमळीचे तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले राजू नवघरे जेव्हा वसमत बाजार समितीचे सभापती होते तेव्हापासून आपण त्याच्या विकासाची तळमळ व धडपड पाहतो तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होते या तरुणाला आमदार करायचेच व मी त्याला आमदार केले.
आता त्याचा विकास व त्याची जनसामान्यांसाठी काम करण्याची धडपड समाजात सर्व स्तरातील नागरिकात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची पोटतिडीक पाहता मी आता त्याला फक्त आमदार ठेवणार नाही तर मंत्री करून टाकतो तुम्ही त्याला खंबीरपणे साथ द्या विक्रमी मताने विजयी करा असे यावेळी त्यांनी सांगितले. (Ajit Pawar) अजित दादा पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे या बाजूचे आहोत. मात्र कोणावर अन्याय होणार नाही ही आपली भूमिका आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची आपली भूमिका आहे सभागृहात आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एक मताने ठराव केला आहे त्या दृष्टीने काम आहे सुरू आहे मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगत त्यांनी मराठा समाजावर आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे भाषण सुरू असताना अचानक मराठा आंदोलक सभास्थळी दाखल झाले घोषणाबाजी केली अजित दादांना निवेदन देण्यासाठी त्यांची धडपड होती अजितदादा पवार यांच्या भाषणाच्या वेळीच हा प्रकार झाला त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण होते काही जणांना व्यासपीठावर जाण्याची अनुमती दिली त्यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत संवाद साधला व आपली भूमिका मांडली अजित दादा पवार यांनी या प्रश्नावर सविस्तर बोलतो असे आश्वासन दिले. पोलिसांनी गोंधळ घातणाऱ्या आंदोलकांना व्यासपीठापासून दूर नेले मात्र सभा स्थळाच्या बाहेरही त्यांची घोषणाबाजी सुरू होती. मराठा आंदोलकांचे निवेदन स्वीकारून अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणात या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. वसमत येथे झालेल्या सभेला प्रचंड संख्येने शेतकरी महिला नागरिक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते वसमते झालेले ही विराट सभा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वसमत येथे जनसमान यात्रा येणार हे फक्त एक दिवस अगोदर आमदार राजू पाटील नवघरे (Raju Navghare) यांना समजले होते एका दिवसात एवढी मोठी तयारी केली व प्रचंड जनसमुदाय सभेला उपस्थित होता हे पाहून (Ajit Pawar) अजितदादा पवारही अवाक झाले त्यांनी त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख करत मी फक्त एक दिवस अगोदर राजूला सभा घेण्याचे सांगितले तर एवढा जनसमुदाय आला आठ दिवस अगोदर सांगितले असते तर काय जनसागर उलटला असता काय असे त्यांनी यावेळी सांगत राजू पाटील नवघरे यांच्या नेतृत्व कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले.