आखाडा बाळापूर (Akhada police) : मंगळवारी आखाडा बाळापूर आठवडी बाजारात एक चिमुकला हरवला होता त्यास पोलिसांनी पोलीस स्थानकात आणून मायेने खाउ बिस्कीट दिले आईवडील विचारपूस केली परंतु तो काहीच उत्तर देत नव्हता पोलिसांनी सोशीलमिडीया माध्यमातून त्याची माहिती सगळ्या ग्रुपवरून प्रसारित केली नंतर पोलीस पाटील ग्रुपवरून त्याची ओळख पटली सदर मुलास (Akhada police) पोलीस स्थानकात पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले त्याला बघताच पालक आजोबा डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
याबाबत (Akhada police) पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर आठवडी बाजारात परीसरातील पन्नास साठ गावचे नागरिक येतात यामुळे मोठी गर्दी आसते आशा गर्दीत आजोबा सोबत बाजारात आलेला चार साडेचार वर्षाचा मुलगा आजोबा पासून दुर गेला हुतात्मा स्मारक समोर तो रडत आसताना त्याला पोलीस स्थानकात आणण्यात आले पोलिसांनी विविध वाटसफ ग्रुपवरून व पत्रकार मंडळी यांनी वाटसफ ग्रुपवरून माहिती दिली.
पोलीस पाटील ग्रुपवरून सदर मुलाची ओळख पटून तो भुरक्याचीवाडी येथील किशन बबन भुरके आसुन आजोबा लक्ष्मण गणपती आमले सोबत बाजारात आला होता बाजार थैली धरून चालताना दोघात थोडी चुकामुक झाली यामुळे तो हरवला होता. पोलिसांनी सोशीलमिडीया माध्यमातून त्यांच्या पालकांचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, बिटप्रमुख रामदास ग्यादलवाड, शिवाजी पवार, राजीव जाधव, महिला पोलीस शिल्पा लोणे यांनी त्यास पालकांच्या हवाली केले. ताटातूट झालेला नातू भेटल्याने आजोबा व पालक मंडळी यांनी पोलीस कर्मचार्यांना धन्यवाद दिले.
सोशल मिडीया सदुपयोग…
मुलगा भेटल्यावर तात्काळ त्याच्या फोटोसह (Akhada police) पोलिस पथकाने व पत्रकार मित्रांनी सोशीलमिडीया माध्यमातून फोटो सह माहिती दिल्यामुळे पोलीस पाटील व्हॉटसअॅप ग्रुपवरून त्याची ओळख पटवण्यात मदत झाली आसल्याच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी सांगितले.गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनी मुलाची ओळख पटवून तात्काळ त्याच्या आजोबाला घेऊन पोलीस स्थानक गाठले.