पातूर (Akola Accident) :- शहर पोलीस स्टेशन (Police station)हद्दीत असलेल्या आनंदानी पेट्रोल पंपासमोर पातूरकडून नागरतास येथे दर्शनासाठी जात भरधाव वेगात जात असलेल्या क्रुझर वाहनाचा अपघात झाला असून एक जण गंभीर असून सहा जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सहा जण जखमी
आज दि.7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास पातूर पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदानी पेट्रोल पंपासमोरील (Petrol Pump)उडान पुलाखाली भरधाव वेगात जात असलेल्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने एम.एच. 29 एडी 5742 क्रमांकाची क्रुझर गाडीला दोन पलट्या झाल्याने जोरदार अपघात झाला असून या अपघातामध्ये गाडीतील प्रवासी असलेल्या बेबीबाई शेळके (वय 60) हे गंभीर जखमी असून सहप्रवासी असलेले प्रदीप महल्ले,प्रियंका शेळके (वय 27),सुनंदा शेळके (वय 52), ऊर्मिला राऊत(54),पार्थ शेळके (6),रेणुका शेळके(वय 44),मंदा शेळके(वय 65) सर्व राहणार सस्ती, ता.पातूर हे जखमी झाले आहेत.
दरम्यान एन.एच.ए.आय व 108 या दोन रुग्णवाहिकेच्या (Ambulance)मदतीने मदतीने सर्व जखमींना प्रथमोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणले असून या अपघातात गंभीर असलेल्या जखमीस पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेच्या डॉ.फैजान जहागीरदार यांनी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविले आहे.