■ अकोट तालुक्यात बियाण्यांचा काळाबाजार !
■ बापरे..! ८६४ चे पाकीट १४०० रूपयांना शेतकरी भटकताहेत वणवण
अकोला (Akola) अकोट तालुक्यात पसंतीचे कपाशी बियाणे (Cotton seed) खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रांवर धाव घेत आहेत. मात्र याठिकाणी लांबच्या लांब रांगा लागत असल्यामुळे अनेकजण संतप्त होऊन माघारी फिरत आहेत. अशातच आता कपाशी बियाण्याच्या काळ्याबाजाराला ऊत आला असून ८६४ रूपयांच्या एका पाकिटासाठी तब्बल १४०० रूपये मोजण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली असल्याचे बोलल्या जात आहे. अकोट तालुक्यात खारपाण पट्ट्यात मुख्यतः कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अकोटात असलेल्या बहुतांश कृषी केंद्रांवर गेल्या शुक्रवारपासून बियाण्याचे वाटप सुरू झाले. गेल्या तीन-चार दिवसांची अवस्था लक्षात घेता कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी छेडणार आक्रोश आंदोलन कोरडवाहू पट्टयात कपाशी वानाचा तुटवडा जाणवत असून हा तुटवडा काहीजण जाणीवपूर्वक निर्माण करीत आहेत. शेतकऱ्यांना धावपळ करूनही बियाणे मिळत नाही. मात्र काहीजण जादा दरात बियाणे घेऊन आपला उल्लू सिधा करीत आहेत. या बाबीकडे लोकप्रतिनिधी व कृषि अधिकारी (Agriculture Officer) यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही आणि शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे मिळाले नाही तर चोहोट्टा विभागात शेतकरी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. तर बियाणे मिळविण्यासाठी सोमवारी चक्क महिला शेतकऱ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. एवढे सर्व करूनही शेतकऱ्यांना केवळ प्रत्येकी दोन बॅगाशिवाय मिळत नसल्याचे दिसत आहे.
■ मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी १९ कृषी केंद्र
अकोट तालुक्यात येत असलेल्या चोहोट्टाबाजार या मुख्य बाजारपेठेच्या (main market) ठिकाणी १९ कृषी केंद्र (19 Agricultural Centre) आहेत. मात्र याठिकाणीही शेतकऱ्यांना तब्बल १२ हजार पाकिटांची गरज असताना केवळ २ हजार पाकिटे उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे चोहोट्टा बाजारसह अकोट तालुक्यात बियाण्याचा काळा बाजार सुरू झाला असून यामध्ये काही कृषी सेवा केंद्रचालक (Service Center Director) व अधिकारी (officer) यांच्या मिलीभगतमुळे काही दलाल या कामात सर्रास सक्रिय झाल्याचे शेतकरी बोलत आहेत.