■ कृषी विद्यापीठामध्ये खरीपपूर्व कृषी मेळावा । बियाणे खरेदीसाठी शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद
– कुलगुरू डॉ. गडाख
अकोला (Akola) :- विद्यापीठनिर्मित पीक वाणवतंत्रज्ञानाच्या (Crop Breeding Technology) प्रभावी वापरातून अधिक उत्पादकता शक्य असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी केले. डॉ. पीडीकेव्हीच्या(Dr. PDKV) विस्तार शिक्षण संचालनालयद्वारे आयोजित खरीपपूर्व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विदर्भात (Vidarbha) बहुतांश भागात सिंचनाची अल्प क्षमता असून, कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असून, मागील पन्नास वर्षांचा सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नाही. पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला असून, यंदा १०६ टक्के पाऊसमानाचे भाकीत आहे. कपाशी व सोयाबीन ( Cotton and soybeans) पिकासोबत योग्य आंतरपिकाची लागवड करून पावसाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे डॉ. गडाख म्हणाले. याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी (Dist. W. Chief Executive) अधिकारी बी. वैष्णवी, महाबीजचे गुणनियंत्रण व संशोधन विभागाचे (Research Department)vमहाव्यवस्थापक संचालक प्रफुल्ल लहाने, प्रतिनिधी गणेश नानोटे,
– प्रफुल्ल लहाने यांनी शेतकरी बांधवांना पेरण्याची घाई न करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला
विद्यापीठाचे संचालक (Director University) शेतकरी विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाचा, तंत्रज्ञानाचा व पीक वाणांचा अवलंब करावा. गाव पातळीवर प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण करण्याची गरज बी. वैष्णवी यांनी यावेळी अधोरेखित केली. प्रफुल्ल लहाने यांनी शेतकरी बांधवांना पेरण्याची घाई न करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा व बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करण्याचे आवाहन केले. महाबीजकडे सर्वच प्रकारच्या बियाणांची योग्य प्रमाणात उपलब्धता असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वस्त केले. तांत्रिक सत्रामध्ये हवामानाचा आढावा, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडींचे व्यवस्थापन’, सोयाबीनचे लागवड तंत्र’, ‘कापूस लागवड तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य व पिकाची उत्पादकता, डाळवर्गीय पिकांची लागवड’, खरीप पिकांमधील रोगाचे नियंत्रण यावर विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन तसेच सादरीकरण केले. याप्रसंगी विद्यापीठातील सर्वच विभागांचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी आणि विदर्भासह संपूर्ण राज्यातून आलेले शेतकरी बांधव सभागृहामध्ये उपस्थित होते.
– हजारांवर शेतकऱ्यांनी केले बियाणे खरेदी
याप्रसंगी सुमारे १ हजार १६० शेतकरी बांधवांनी विद्यापीठ संशोधित नवीन पीक वाण बियाणे खरेदीसाठी अभूतपूर्व प्रतिसाद देत विद्यापीठावरील आपला विश्वास अधोरेखित केला. शास्त्रज्ञांना सल्ला आवश्यक डॉ. उंदीरवाडे सध्या विविध पिकांवरील किडी व रोगांचे आक्रमण लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध राहायला हवे. त्याचप्रमाणे वेळीच शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी सांगितले. सेंद्रिय खत (Organic fertilizers) रासायनिक खतांवर (chemical fertilizers) तोडगा गणेश नानोटे कृषी विद्यापीठाकडे (Agricultural University) शेतकऱ्यांच्या ज्ञानाची भूक शमविण्याकरिता आधुनिक कृषी तंत्राची भक्कम शिदोरी उपलब्ध असल्याचे प्रगतिशील कास्तकार गणेश नानोटे यांनी नमूद केले. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर पिकांना सेंद्रिय खत देणे हा एक उत्तम तोडगा असल्याचे ते म्हणाले.