अकोला (Akola Assault Case) : एमआयडीसीमध्ये एका ३० वर्षीय युवकावर दोघांनी प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हरेकृष्ण दालमिलच्या गेटजवळ ही घटना घडली. गंभीर जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील ३० वर्षीय गुलाबसिंग राजारामसिंह जांबदेकर हा हरेकृष्ण दालमिलमध्ये काम करतो. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दोघेजण दुचाकीवर आले आणि त्यांनी गुलाबसिंगला पकडले व धारदार शस्त्राने मारहाण (Akola Assault Case) केली. यावेळी जगदिश घ्यारे त्यांच्या शिवणी येथील घरी जात असता, त्यांना एका युवकाला मारहाण होत असल्याचे दिसले. त्यांनी आपली गाडी थांबवून त्या युवकाची सुटका करण्याच्या इराद्याने ते गेले. त्यांनी त्या दोघांच्या तावडीतून गुलाबसिंगची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला झटका देऊन ते दुचाकीवरून पळून गेले.
यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत गुलाबसिंग पडला होता. त्याच्या छातीत व कुशीमध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंर जगदीश घ्यारे यांनी त्यांच्या दुचाकीच्या नंबरचा फोटो काढला होता. (Akola Assault Case) घटनेची माहिती त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांनी गुलाबसिंगला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.