पातूर (Akola) :- आजादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी २०२३ मध्ये स्वतंत्रदिनाच्या आधी देशाच्या वीर शहिदांना सन्मान देण्यासाठी मेरी माटी, मेरा देश, अभियान चालवले जाणार असल्याची घोषणा केली होती. या संकल्पनेच्या उपक्रमाला पातुर तालुक्यासह जिल्ह्यातील सरपंच सचिव यांनी मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत ग्राम पंचायत अंतर्गत शिलालेख फलकाचे बांधकाम केले. मात्र दीड वर्ष उलटूनही पातुर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्राम पंचायत बांधकाम झालेल्या शिलालेख निधीच्या प्रतीक्षेत आहे. पातुर तालुक्यासह जिल्ह्यातील शिलालेख बांधकामाचा निधी त्वरित देण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेचे पातुर तालुका अध्यक्ष जहूर खान यांनी १२ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पातूरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, यांना निवेदन दिले आहे.
पातुर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षांचे सीईओंना निवेदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच्या आदेशाचे पालन करून शिलालेख फलकाचे बांधकाम केले, मात्र दीड वर्षापासून शिलालेख बांधकामाचा निधी मिळाला नाही,रखडलेला निधी देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी, यांना निवेदन दिले आहे.